6.20 कोटींची जमीन, म्युचअल फंडांमध्ये गुंतवणूक; शशी थरूरांच्या नावावरील एकूण संपत्ती किती?

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याजवळ दोन वाहनं आहेत. यातील एक मारूती सियाज आणि दुसरी मारूती एक्सएल 6. 2014 मध्ये शशी थरूर यांनी  23 कोटींहून अधिकच्या संपत्तीची घोषणा केली होती आणि  2019 मध्ये 35 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins
तिरुवनंतपुरम:

काँग्रेसचे वरिष्ठ नेता शशी थरूर यांनी बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शशी थरूर यांनी आपल्या उमेदवारी अर्जात 55 कोटींहून अधिक संपत्तीचा उल्लेख केला आहे. 2022-2023 या वर्षात त्यांची एकूण संपत्ती 4.32 कोटींहून अधिक होती. आपल्या उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि व्यवहाराबद्दलची माहिती दिली जाते. यामध्ये शशी थरूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याजवळ 49 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे. 19 बँकांच्या खात्यांमध्ये संपत्ती जमा असून विविध डिबेंचर, म्युचअल फंडमध्येही गुंतवणूक केली आहे. शशी थरूर यांनी परदेशी इक्विटी, कॉर्पोरेट बाँड व्यतिरिक्त बिटकॉइन ETF  मध्येही पैसे गुंतवले आहेत.  

थरूर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 6.75 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता आहे. ज्यापैकी पलक्कडमध्ये 2.51 एकर शेती वडिलोपार्जित आहे. याची किंमत सध्या  1.56 लाखांपर्यंत जाते. याशिवाय त्यांच्याजवळ तिरुवनंतपुरममध्ये स्वत: विकत घेतलेल्या 10.47 एकर जागेचा समावेश आहे. ज्याची किंमत सध्या 6.20 कोटींहून अधिक आहे. त्याच्या घराची किंमत तब्बल 52 लाख रुपये आहे. 

Advertisement
प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्यानुसार, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याजवळ दोन वाहनं आहेत. यातील एक मारूती सियाज आणि दुसरी मारूती एक्सएल 6. 2014 मध्ये शशी थरूर यांनी  23 कोटींहून अधिकच्या संपत्तीची घोषणा केली होती आणि  2019 मध्ये 35 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. 

आपली उमेदवारी दाखल करण्यापूर्वी थरूर यांनी पद्मनाभ स्वामी मंदिर आणि पझावंगडी गणपती मंदिरासह आपल्या मतदारसंघातील प्रसिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिरुवनंतपुरम मतदारसंघातील तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. या जागेवरुन निवडणुकीच्या मैदानात थरूर यांच्याव्यतिरिक्त भाकपाचे वरिष्ठ नेता पन्नियन रवींद्रन आणि भाजप नेता-केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. यूएनचे माजी मुत्सद्दी शशी थरूर यांनी  2009 च्या लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम जागेवरुन विजय मिळवला होता. केरळच्या सर्व 20 लोकसभा जागांसाठी 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Advertisement