- शिमला के एआईएमएस अस्पताल में कुत्ते ने एक मरीज के अम्प्यूटेड अंग को मुंह में दबाकर घूमते हुए देखा गया
- जांच में पाया गया कि बायोमेडिकल वेस्ट कॉम्प्लेक्स का दरवाजा सफाई कर्मियों ने खुला और असुरक्षित छोड़ दिया था
- कुत्ते ने पैक किए गए बैग से अम्प्यूटेड अंग निकाल लिया और उसे सड़क पर लेकर घूमता दिखा
शिमल्याच्या 'अटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सुपर स्पेशालिटी' (AIMSS) चमियाणा या रुग्णालयातून एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी एक कुत्रा मानवी शरीराचा भाग (पाय) तोंडात दाबून फिरत असल्याचे काही लोकांनी पाहिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आणि तत्काळ चौकशी समिती स्थापन करण्यात आली. आता या प्रकरणात नेमकी चूक कोणाची होती, याचा मोठा खुलासा झाला आहे.
नेमका प्रकार काय घडला?
रुग्णालयाचे एमएस डॉ. सुधीर शर्मा यांनी चौकशी समितीच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी रुग्णालयाच्या CTVS विभागात एका रुग्णाच्या गुडघ्यावरील भागाची शस्त्रक्रिया करून तो भाग वेगळा करण्यात आला होता. नियमानुसार हा अवयव बायोमेडिकल वेस्ट बॅगमध्ये पॅक करून कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आला होता. तो 'एन्व्हायरो इंजिनिअर्स' या कचरा उचलणाऱ्या एजन्सीने नेणे अपेक्षित होते. सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा ठेवताना बायोमेडिकल वेस्ट कॉम्प्लेक्सचा दरवाजा उघडा आणि तसाच सोडला. याच संधीचा फायदा घेऊन एका कुत्र्याने तो पॅक केलेला मानवी भाग पळवला.
(नक्की वाचा- Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)
कुत्र्यासमोर सुरक्षा रक्षक हतबल
21 तारखेला अवयव बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर सफाई कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. 24 फेब्रुवारीला जेव्हा तोच कुत्रा पाय तोंडात घेऊन फिरताना दिसला, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी तो परत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्रा आक्रमक होऊन पळून गेल्याने सुरक्षा रक्षकही काही करू शकले नाहीत.
(नक्की वाचा- Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)
कारणे दाखवा नोटीस
या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली असून, प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. 21 फेब्रुवारी रोजी ड्युटीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसह सॅनिटेशन सुपरवायझरला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. सॅनिटेशन कंत्राटदाराला बायोमेडिकल वेस्टची सुरक्षा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कचरा उचलणाऱ्या एजन्सीला वेळेत कचरा उचलण्याची सक्त ताकीद दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world