राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-मुंबई महामार्गावर ट्रक चालकाने अचानक यू-टर्न घेतल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. ट्रक चालक अपघातानंतर फरार असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाहा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबिय सीकरहून रणथंभोर येथील गणपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्यांनुसार, एक ट्रक वेगाने महामार्गावरुन धावत आहे. त्यामागून दुसऱ्या लेनमधून एक कार देखील दिसत आहे. काही अंतरावर जाताच ट्रकने अचानक डाव्या बाजूला टर्न घेतला. मात्र मागच्या बाजूने येणारी कार थेट ट्रकला जाऊन धडकली. अचानक ट्रक समोर आल्याने कार अनियंत्रित झाली. कार टकच्या दोन चाकांमध्ये शिरल्याने कारचा चक्काचूर झाला. त्यानंतर ट्रकचालकाने ट्रक सुरु करुन काही अंतरावर थांबला.
(नक्की वाचा- वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन')
अपघातात कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्या जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये मनीष शर्मा, त्यांची पत्नी अनिता शर्मा, सतीश शर्मा, पूनम, संतोष, त्यांचे मित्र कैलाश यांचा समावेश आहे. तर दोन मुले मनन आणि दीपाली गंभीर जखमी आहेत.
(नक्की वाचा- पोलिसांवर हल्ला, मनगट चावली, कपडे फाडले; विरारमध्ये 3 मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा )
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. जखमी प्रवाशांना योग्य मदत पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत.