Shocking Love Story: लग्न हा जिवनातला अतिशय महत्वाचा क्षण. सात जन्माची शपथ घेवून दोन जीव एक बंधनात अडकतात. एकमेकांना साथ देतात. सहारा देतात. लग्न आणि प्रेमाला तसं वय नसतं. सध्या आपण याची अनेक उदाहरण पाहात असतो. जास्त वयाची व्यक्ती आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत लग्न करताना दिसतात. तर कुठे जास्त वयाची मुलगी आपल्या पेक्षा लहान मुला बरोबर लग्न केलेल्या घटना ही समोर आल्या आहेत. अशात एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे. या चक्क 70 वर्षांच्या आजोबांनी 30 वर्षाच्या तरुणी सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाची चर्चा मोहल्ल्यात चांगलीच रंगली आहे.
हे अनोख लग्न झालं आहे छत्तीसगडणध्ये. छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्याच्या सरकंडा परिसरातून एक वेगळी आणि कौतुकास्पद प्रेम कहाणी समोर आली आहे. चिंगराजपारा अटल आवास येथे राहणारे 70 वर्षांचे आजोबा दादू राम गंधर्व यांनी 30 वर्षीय तरुणीसोबत लग्न केले आहे. त्यांनी हे लग्न करून एक प्रकारे पारंपरिक सामाजिक बंधनांना आव्हान दिले आहे. दोघांनीही परिसरातील शिव मंदिरात पूर्ण विधी-विधानाने सात फेरे घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रेमाला अधिकृत ओळख दिली. त्यांच्या या लग्नाने गावकरी आवाक झाले आहे. शिवाय या लग्नाची चर्चा ही जोर धरू लागली आहे.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
या लग्ना मागची प्रेम कहाणी ही तेवढीच रोचक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादू राम हे मजुरीचे काम करतात. त्याच मोहल्ल्यात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्यांची ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये तब्बल 40 वर्षांचे अंतर आहे. पण प्रेमाला वय नसतं तेच या दोघांनी खरं करून दाखवलं आहे. त्यांनी वयाची बंधनं तोडत एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यातील समर्पण दिसून येते. एकमेकाला दिलेली वचन पाळायची अशी शपथ दोघांनी घेतली होती. ते दोघांनीही पाळत समाजाला धक्का दिला आहे.
आज दोघांनीही सर्व रीतीरिवाजांचे पालन करत लग्न केले. वरमाला, सिंदूर आणि सात फेऱ्यांचे सर्व विधी मोठ्या उत्साहाने पार पडले. विशेष म्हणजे मोहल्ल्यातील लोकांनीही बँड-बाजासह या अनोख्या लग्नात सहभाग घेतला. नवदाम्पत्याला शुभेच्छा ही दिल्या. स्थानिक लोकांच्या मते, वयाचा मोठा फरक असूनही या दोघांमधील प्रेम आणि एकनिष्ठता पाहून सर्वांना आनंद झाला आहे. या अनोख्या जोडीने सिद्ध केले आहे की, खरे प्रेम असेल तर वय ही फक्त एक संख्या असते हेच या दोघांनी आता लग्न करून दाखवन दिले आहे.