जाहिरात

Interesting news: भारतातल्या'या' गावाला का म्हणतात 'सायलेंट व्हिलेज'? सत्य जाणून तुम्ही व्हाल भावूक

आपल्याला गावाकडची सकाळ म्हटली की पक्षांची किलबिल, लोकांची लगबग आणि हास्यविनोद या गोष्टी आपोआप येतात.

Interesting news: भारतातल्या'या' गावाला का म्हणतात 'सायलेंट व्हिलेज'? सत्य जाणून तुम्ही व्हाल भावूक
  • डडकई हे जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गाव Silent Village म्हणून प्रसिद्ध आहे.
  • या गावातील बहुतेक लोक अनुवांशिक कारणांमुळे बोलू आणि ऐकू शकत नाहीत
  • मूकबधिरतेची पहिली नोंद १९०१ मध्ये झाली असून, पिढ्यानपिढ्या हा विकार गावात वाढत गेला आहे

Silent Village: भारतात असं एक गाव आहे जे सायलेंट व्हिलेज म्हणून ओळखलं जातं. हे गाव अतिशय सुंदर असून त्याला निसर्गाचं जणू वरदान लाभलं आहे. त्याला सायलेंट व्हिलेज म्हणण्या मागे ही एक कारण आहे. हे गाव   जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य कडेकपाऱ्यांमध्ये वसलेले आहे. डोडा जिल्ह्यातील गंडोह तहसीलमध्ये असलेले 'डडकई' हे गाव जगासाठी 'Silent Village' (शांत गाव) म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच त्याची चर्चा सगळीकडे आहे. या गावाचे नैसर्गिक सौंदर्य जितके मनाला भुरळ पाडणारे आहे, तितकीच येथील सामाजिक परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. या गावाला 'सायलेंट व्हिलेज' का म्हणतात, यामागचे सत्य अत्यंत भावूक करणारे आहे.

डडकई गावातील वास्तव अत्यंत भयंकर आहे. या गावातील बहुतांश ग्रामस्थ बोलू शकत नाही. अनेकांना बोलण्या सोबत ऐकू ही येत नाही. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात इतर गावांसारखा लहान मुलांचा किलबिलाट किंवा माणसांचा गजबजाट ऐकायला मिळत नाही. या गावासाठी गोंधळ गडबड या गोष्टी फार दुरच्या आहेत. येथील लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फक्त हाताच्या इशाऱ्यांचा (Sign Language) वापर करतात. या इशाऱ्यावरूनच अनेक गोष्टी होतात. विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

नक्की वाचा - Sangli News: मुस्लीम तरुणीशी प्रेम, 19 वर्षाचा तरुण लग्नासाठी वेडापिसा, पण तिची एक अट अन् आयुष्य उद्ध्वस्त

हे गाव असं का असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल. या गावात मूकबधिरतेची पहिली केस 1901 मध्ये समोर आली होती. त्यानंतर पिढ्यानपिढ्या हा आजार संपूर्ण गावात पसरत गेला. तो आज ही या गावात आहे. जणू त्यांच्या पाचवीला पुजलेला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तज्ज्ञांच्या मते, यामागचे मुख्य कारण 'अनुवांशिकता' (Genetic Reasons) हे आहे. एकाच समाजात किंवा जवळच्या नातेसंबंधात लग्न करण्याची प्रथा असल्यामुळे हा जनुकीय दोष पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत गेल्याचं सांगितलं जातं. मात्र, गावातील काही जुनी जाणती मंडळी याला दैवी शाप मानतात.

नक्की वाचा - Siya Goyal: सिया गोयलचं प्रत्येक राज 'या' व्यक्तीला होतं माहित? मैत्री, प्रेम अन् हत्येमागे तिसरी व्यक्ती

आपल्याला गावाकडची सकाळ म्हटली की पक्षांची किलबिल, लोकांची लगबग आणि हास्यविनोद या गोष्टी आपोआप येतात. असं कोणत्या गावात नसेल असं एक ही गाव शोधून सापडणार नाही.  पण भारतामध्ये एक असंही गाव आहे, जिथे अथांग शांतता पसरलेली असते. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील 'डडकई' गावाला लोक 'Silent Village' म्हणून ओळखतात. सुंदर डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे गाव आता जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामागे त्या गावाची शांतता कारणीभूत आहे. पण या शांतते मागील कराण ही तितकेच वेदनादायी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com