लवकरच 'चांदी लाखात'; आज चांदीच्या दराने बाजारात खळबळ, काय आहेत दर?

सोन्यात नियमित वाढ होत असताना आता चांदीच्या भावात तुफान तेजी पाहायला मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे. सोन्यात नियमित वाढ होत असताना आता चांदीच्या भावात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीचा दर जीएसटीशिवाय 96 हजार 493 रुपये नोंदविला गेला आहे. येत्या दोन तीन दिवसांत चांदीची किंमत एक लाख रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान सोन्याच्या दरात मात्र काहीसं थंड वातावरण पाहायला मिळत आहे. आजचा चांदीचा भाव GST शिवाय 72 हजार 275 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. 

औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्याने चांदीतचा दर गगनाला भिडला आहे. चांदी ही उत्तम विद्युतवाहक आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेक्ट्रिक वाहनं यात चांदीचा वापर गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे 1 एप्रिल 2024  पासून चांदीचा दर 30 टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरांमध्येही होताना दिसत आहे.