एकाच कुटुंबातील चौघांना सर्पदंश, 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू

चौघांना करैत जातीचा साप चावला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या सापाला सायलेंट किलर म्हटलं जातं. करैत साप खूप विषारी असतो. हा साप चावल्याने दुखत नाही. त्यामुळे अनेकांना साप चावल्याचं लक्षात देखील येत नाही.   

Advertisement
Read Time: 2 mins

ओडिशाच्या बौधमध्ये एक चकीत करणारी मात्र तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांना सर्पदंश केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या वडिलांची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. सुधीरेखा मलिक, शुभरेख मलिक आणि सौरभी मलिक अशी मृत मुलींची नावे आहेत. 

रविवारी रात्री ही घटना घडली आहे. चारियापाली गावात सुरेंद्र मलिक हे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. रात्री मुलीची तब्येत बिघडल्याने सर्व कुटुंबीय जागे झाले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरेंद्र यांनी पाहिलं की जवळच साप होता. तीन मुलींसह सुरेंद्र यांनाही साप चावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने पत्नीला बोलावलं. 

(नक्की वाचा -  Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू)

चौघांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिन्ही मुलींना मृत घोषित केलं. तर सुरेंद्र यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

चौघांना करैत जातीचा साप चावला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या सापाला सायलेंट किलर म्हटलं जातं. करैत साप खूप विषारी असतो. हा साप चावल्याने दुखत नाही. त्यामुळे अनेकांना साप चावल्याचं लक्षात देखील येत नाही.   

(नक्की वाचा- पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी)

ओडिशामध्ये दरवर्षी जवळपास 2500 ते 6000 लोकांना साप चावल्याच्या घटना समोर येतात. 2023-24 मध्ये साप चावल्यामुळे जवळपास 1011 लोकांचा मृत्यू झाला. ओडिशा सरकारकडून साप चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबियांना 4 लाखांची मदत दिली जाते. 

Topics mentioned in this article