पुण्यातल्या पौड फाटा परिसरात एका मद्यधुंद टेम्पो ड्रायव्हरने दोन ते तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन जणं गंभीर जखमी आहेत. (Pune Hit and Run)
गीतांजली श्रीकांत अमराळे (34) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. गीतांजली या पती श्रीकांत अमराळे यांच्यासोबत 8 सप्टेंबर रोजी रात्री 9.15च्या सुमारास त्या भागातून जात होते. तेव्हाच एका मद्यधुंद टेम्पो ड्रायव्हरने त्यांना मागून जोरात धडक दिली. ही धडक खूप जोरदार होती. यामध्ये गीतांजली आणि इतर तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु उपचारादरम्यान गीतांजली यांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - मुरुड हादरलं! अनैतिक संबंधाने घेतला जीव, टाकीत तरंगत होता मृतदेह
अलंकार पोलीस स्टेशनमध्ये 27 वर्षीय टेम्पो ड्राइवर आशिष अनंत पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो दारूच्या नशेक पिकअप कार चालवित होता. या अपघातात गीतांजली यांचे पती श्रीकांत अमराळे गंभीर जखमी आहेत. ते मनसे कोथरुडचे जन विभागाचे अध्यक्ष देखील आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world