मान्सूनचे आगमन कधी होणार याची चातक पक्षा प्रमाणे सर्वच जण वाट पाहात होते. त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. अखेर मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा मान्सूनचा प्रवास आता तसाच पुढे होणार आहे. केरळ प्रमाणेच इशान्य भारतातही पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. आता महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार याची प्रतिक्षा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेमल चक्रीवादळाची उपस्थिती अजूनही आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने वर्तवलेल्य अंदाजाच्या दोन दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. शिवाय इशान्य भारताच्या दिशेनेही त्याने कुच केली आहे. मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे.
हेही वाचा - New Rules 2024: 1 जूनपासून गॅस सिलिंडर, आधार कार्डच्या नियमांमध्ये होणार हे बदल, थेट होणार परिणाम
केरळमध्ये दाखल झालेल्या या मान्सूनचा प्रवास पुढे केरळ कर्नाटक महाराष्ट्र असा होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून 10 जूनला दाखल होईल. त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय राज्यातल्या अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या आहे. पाऊस झाल्यात तो प्रश्नही मार्गी लागेल. त्यामुळे सर्वच जण 10 जूनची वाट पाहात आहेत.
रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान केरळमध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस होत आहे. शिवाय मे महिन्यात तुलनेत केरळमध्ये जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान इशान्य भारतात 5 जून पर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज आहे.