जाहिरात
Story ProgressBack

New Rules 2024: 1 जूनपासून गॅस सिलिंडर, आधार कार्डच्या नियमांमध्ये होणार हे बदल, थेट होणार परिणाम

Rules changing from 1st June 2024: जून महिन्यामध्ये गॅस सिलिंडर, बँकांच्या सुट्या, आधार कार्ड अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Read Time: 3 mins
New Rules 2024: 1 जूनपासून गॅस सिलिंडर, आधार कार्डच्या नियमांमध्ये होणार हे बदल, थेट होणार परिणाम
1st June 2024 New Rules: 1 जूनपासून वाहतुकीचे नवे नियम होणार लागू

New Rule From 1 June 2024: एक जूनपासून तुमच्या घरगुती खर्चाशी संबंधित असणाऱ्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून कित्येक नवे नियम लागू होतात. या वेळेसही पूर्वीपेक्षा नियम अधिक कठोर केले जाणार आहेत. जून महिन्यामध्ये गॅस सिलिंडर, बँकांच्या सुट्या, आधार कार्ड अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो. यामुळे तुमचे  महिन्याचे बजेटही कोलमडू शकते.

Rule Change From 1 June 2024: एक जूनपासून कोणकोणते नियम बदलणार आहेत? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

पेट्रोल-डिझेलसह एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती सिलिंडरची किंमत ठरवली जाते. 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किंमत ठरवतील. मे महिन्यामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. आता जून महिन्यामध्येही सिलिंडरच्या किमतींमध्ये घट होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल होणार आहेत.

(नक्की वाचा: 14 जूननंतर 10 वर्ष जुने अपडेट ने केलेले आधारकार्ड बंद होणार? फुकटात असं करा अपडेट)

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOमध्ये जाण्याची आवश्यकता नाही 

एक जूनपासून वाहतुकीशी संबंधित नवे नियम (New Driving License Rules 2024) लागू होत आहेत. यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स  (Driving license Apply) मिळवण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही. सरकारद्वारे मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरिता परीक्षा (Driving license Test) देऊ शकता. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.

(नक्की वाचा: AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी

वाहतुकीचे नियमही होणार कठोर 

नव्या नियमांतर्गत वाहतुकीचे नियमही कठोर करण्यात येणार आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना 25 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यासह 25 वर्षे नवीन लायसन्स मिळू शकणार नाही. याशिवाय अन्य नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. भरधाव वेगाने वाहन चालवल्यास एक हजार ते दोन हजार रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.

(नक्की वाचा: ऑनलाइन जेवण मागवताय, थांबा! त्याआधी ही बातमी वाचा...)

मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा 14 जूनपर्यंत 

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAIनुसार, तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card Update Online) 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर 14 जूनपर्यंत आधार कार्ड अगदी मोफत अपडेट (Free Aadhaar Update) करू शकता. UIDAI पोर्टलवर आधार कार्ड अपडेट (Update Aadhaar online) करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण 14 जूननंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. आधार केंद्राला भेट देऊनही तुम्ही हे काम करू शकता, पण यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.  

जूनमध्ये बँकांना 12 दिवस सुट्या 

जून महिन्यामध्ये बकरी ईद, वट सावित्री यासह विविध सण तसेच साप्ताहिक सुट्यांमुळे बँका 12 दिवस (Bank Holidays 2024 in India बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  (RBI)अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमुळे (Lok Sabha Elections 2024 Phase 7) 1 जूनला कित्येक राज्यांतील बँकांना सुटी असणार आहे. या काळात तुम्ही बँकिंग क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे लवकरात लवकर आटोपून घ्या.  

VIDEO: 3 दिवसांचा मेगाब्लॉक, शेकडो लोकल रद्द...मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार खडतर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
14 जूननंतर 10 वर्ष जुने अपडेट ने केलेले आधारकार्ड बंद होणार? फुकटात असं करा अपडेट
New Rules 2024: 1 जूनपासून गॅस सिलिंडर, आधार कार्डच्या नियमांमध्ये होणार हे बदल, थेट होणार परिणाम
health care nutritionist tips benefits for skin how to eat mangoes
Next Article
आंबा खाल्ल्याने त्वचेला मिळतील हे फायदे, न्युट्रिशनिस्टने सांगितली खाण्याची योग्य पद्धत
;