Budget 2025-26: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. कर सवलतींची अपेक्षा फोल ठरल्याने आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी मोठी गटांगळी खाल्ली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण संपवताच गुंतवणूकदारांनी आक्रमक विक्री सुरू केली. दुपारी 12.34 वाजेपर्यंत सेन्सेक्स 1348.50 अंकांनी घसरून 80,921.73 वर, तर निफ्टी 494.35 अंकांनी घसरून 24,826.30 वर पोहोचला होता.
घसरणीची मुख्य कारणे
कर सवलतीचा दिलासा नाही
मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला प्राप्तिकरात (Income Tax) मोठ्या सवलतीची अपेक्षा होती, मात्र अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल न केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला.
(नक्की वाचा- मोठी घोषणा! विद्यार्थ्यांमधून घडणार 'इन्फ्लुएन्सर्स'! 15000 शाळांमध्ये सरकार उभारणार कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स)
STT मध्ये मोठी वाढ
सरकारने कमोडिटी फ्युचर्सवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) 0.02% वरून वाढवून 0.05% करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय फ्युचर्सवरील एसटीटी 0.05% आणि ऑप्शन्स प्रीमियमवर 0.15% पर्यंत वाढवण्यात आल्याने ट्रेडिंगचा खर्च वाढणार आहे, ज्याचा फटका थेट मार्केट व्हॉल्यूमवर बसला आहे.
नफा वसुली
बजेटच्या अनिश्चिततेमुळे आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली केली.
(नक्की वाचा- Union Budget 2025-26: चीनच्या 'दादागिरी'ला भारताचे उत्तर! एका घोषणेने संरक्षण , EV क्षेत्राला मिळणार मोठी ताकद)
कोणते शेअर्समध्ये पडझड
BEL, SBI, आणि NTPC यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. टायटन, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्येही 1 ते 3 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. STT वाढल्याने BSE आणि एंजल वन यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स 10% पर्यंत कोसळले.