दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. 26 जानेवारी रोजी पीडित विद्यार्थीनीने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या विषयावर भाषण देऊन सर्वांची मनं जिंकली होती. यासाठी तिला पुरस्कारही मिळाला. त्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली आहे. 7 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. आरोप शिक्षकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीडित तरुणीने प्रजासत्ताक दिनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या विषयावर जबरदस्त भाषण केले होते. मात्र अवघ्या 11 दिवसातच तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय शिक्षकाने त्याच्या वाढदिवसाच्या बहाण्याने विद्यार्थिनीला एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
शिक्षकाने मुलीला बोर्डाच्या परीक्षेत नापास करणयाची धमकी दिल्याचाही आरोप आहे. मात्र पीडित तरुणीने हिंमत दाखवत घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर घरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांना आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
मुलीचं पोलीस बनण्याच स्वप्न
पीडित मुलीचे आई-वडील शेतीकाम करतात. 'मला नेहमीच पोलीस अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी मी तयारी करेन. विज्ञान आणि गणित हे माझे आवडते विषय आहेत. माझ्या बोर्डाच्या निकालांनंतर मी माझा पुढील विषय निवडेन, असंही पीडित मुलीने सांगितलं. एवढ्या भयानक स्थितीतून जात असताना देखील तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीय करण्याचं ठरवलं आहे.
(नक्की वाचा- Explainer: दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण?)
विद्यार्थिनीच्या मुख्यध्यापकांनीही तिचे कौतुक केले. "ती एक हुशार विद्यार्थिनी आहे जी कधीही वर्ग चुकवत नव्हती. आव्हानात्मक काळातून पीडित मुलगी धैर्याने आणि चिकाटीने पुढे जात आहे ते प्रेरणादायी आहे", असं तिच्या मुख्यध्यापकांनी म्हटलं.