जाहिरात

Success Story: 17 वर्षांच्या इमरानने कमाल केली, 6 महिन्यात 5 कोटींची कंपनी उभी केली, आयडिया पाहून व्हाल थक्क

हे ॲप विद्यार्थ्यांना एआईच्या मदतीने अभ्यास करणे, नोट्स तयार करणे आणि करिअर मार्गदर्शन मिळवण्यासाठी मदत करते.

Success Story: 17 वर्षांच्या इमरानने कमाल केली, 6 महिन्यात 5 कोटींची कंपनी उभी केली, आयडिया पाहून व्हाल थक्क
  • जम्मू-काश्मीरमधील १७ वर्षीय इम्रान चौधरीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात यशस्वी स्टार्टअप सुरू केलं
  • लॅगनेव्हर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 6 महिन्यांत 5 कोटी रुपयांचे मूल्यांकन प्राप्त केले
  • लॅगनेव्हर एआय ॲप १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले असून शिक्षणासाठी उपयुक्त आहे

काही तरुण आपल्या इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर मोठ-मोठे कारनामे करत असतात. असाच एक कारनामा  जम्मू-काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातील डुंगी सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे. या तरुणाचं नाव इम्रान चौधरी आहे. विशेष म्हणजे तो अवघ्या 17 वर्षांचा आहे. इम्रानने   तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनांचा सामना करत इम्रानने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

त्याने 'लॅगनेव्हर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड' (Lagnever Technologies Private Limited) नावाने कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी स्टार्टअप आहे. या कंपनीचे मुख्य उत्पादन 'लॅगनेव्हर एआय' (Lagnever AI) हे ॲप आहे. त्याने अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीचे मूल्यांकन 5 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे.

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव

इम्रानने आपल्या यशाचे श्रेय आपल्या 12 जणांच्या टीमला दिल्या आहे. टीम जरी छोटी असली तरी कामगिरी मोठी असल्याचं तो म्हणाला आहे. यामध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) अनिस अझीझ, संचालक सरफराज हुसेन, सोशल मीडिया व्यवस्थापक अर्णव बलगोत्रा आणि शोएब कुरेशी यांचा समावेश आहे. कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) मोहीब अल्ताफ यांनी ॲपच्या प्रसिद्धीसाठी आणि डाउनलोड्स वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे इम्रानने सांगितले आहे.

नक्की वाचा - Kalyan News: खांद्यापर्यंत पाणी, चिमुकल्यासह 3 जण अडकले, पोलीस अधिकारी थेट पाण्यात उतरले अन्...

इम्रान चौधरीच्या या यशाची दखल जागतिक स्तरावर ही घेण्यात आली. प्रसिद्ध ग्लोबल फर्म 'ब्लॅकरॉक' (BlackRock) शी संबंधित एका आंतरराष्ट्रीय प्रोग्रामसाठी जगभरातून केवळ 60 तरुण संस्थापकांची निवड करण्यात आली. त्यात इम्रानचा समावेश आहे. या अंतर्गत बेंगळुरूमध्ये 6 महिन्यांचे सत्र होणार आहे. यातून जागतिक समस्या सोडवण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून अशा प्रकारचे पहिले एआय ॲप तयार झाले आहे. या स्टार्टअपला केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे असं ही त्याने म्हणले आहे. हे ॲप विद्यार्थ्यांना एआईच्या मदतीने अभ्यास करणे, नोट्स तयार करणे आणि करिअर मार्गदर्शन मिळवण्यासाठी मदत करते.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com