जाहिरात

'चीनने जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळलं? देशभक्त असता तर...'; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

2023 मधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

'चीनने जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळलं? देशभक्त असता तर...'; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

Rahul Gandhi News : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरोधात कथित टिप्पणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांना तीव्र शब्दात फटकारलं.  

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारलं...

चीनने भारताच्या दोन हजार किलोमीटरपर्यंत जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळालं. जर तुम्ही सच्चे भारतीय असता तर असं म्हणू शकला नसता. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधीनी केलेल्या वक्तव्यावर असहमती दर्शवली. राहुल गांधीचे वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सुरुवातीच्या युक्तिवादात म्हणाले, जर विरोधी पक्ष नेत्याला एखादा महत्त्वाचा मुद्दा उचलू दिला जात नसेल नसेल तर ही दुर्देवी परिस्थिती असेल.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दत्ता पुढे म्हणाले, तुम्हाला जे काही म्हणायचं ते संसदेत का सांगत नाही. तुम्ही सोशल मीडिया पोस्टमध्ये का सांगता? राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवत न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय अशी वक्तव्य का करीत आहात? तुम्ही खरे भारतीय असता तर असं म्हणला नसता. 

PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर

नक्की वाचा - PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर


राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान नेमकं काय म्हणाले होते? 

2023 मधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. राहुल गांधीनी दावा केला आहे की, चीनने दोन हजार वर्ग किलोमीटर भारती जागेवर नियंत्रण मिळवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला होता. यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com