तमिळनाडू हादरले! बेपत्ता काँग्रेस नेत्याचा जळालेला मृतदेह सापडला

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या काँग्रेस नेत्याचा मृतदेह सापडला आहे. हा नेता अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. या नेत्याच्या शेतजमिनीमध्येच तो सापडला होता. त्याचा मृत्यू कसा आणि का झाला याचा पोलीस शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तीन पथके तयार केली आहेत.   केपीके जयकुमार असं या नेत्याचे नाव आहे. शनिवारी ते तिरुनेलवेल्ली मधील त्यांच्या शेतजमिनीत सापडले होते. जयकुमार हे गुरुवारपासून बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांत दिली होती.  जयकुमार यांनी मृत्यूपूर्वी जबाब दिला असून पोलिसांनी तो नोंदवून घेतला आहे. जयकुमार हे तिरुनेलवेल्ली पूर्व जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष होते.  

Advertisement

जयकुमार यांची हत्या करण्यात आली का त्यांनी जीवन संपवले हे स्पष्ट झालेले नाही. सदर प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Advertisement

(नक्की वाचा- किराणा दुकानात सुरू होती भलत्याचा मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले)

काराईसुथू पुदूर गावातील शेतजमिनीमध्ये जयकुमार यांचा मृतदेह सापडला होता. जयकुमार हे सरकारी ठेकेदार होते आणि ते व्यावसायिकही होते. जयकुमार हे  काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. जयकुमार बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा करुथय्या जाफ्रीन (28 वर्षे) याने पोलिसांत वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास जयकुमार बेपत्ता झाले अशी तक्रार त्यांच्या मुलाने केली होती. सदर प्रकरण शुक्रवारी रात्री पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचले होते. 

Advertisement

( नक्की वाचा : 'पतीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध बलात्कार नाही' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )

प्राथमिक पोलीस तपासात पोलिसांना कळाले आहे की जयकुमार यांच्याकडून कर्जे घेणाऱ्यांपैकी काहीजणांनी त्यांना धमकावले होते. कर्जाची रक्कम परत मागितल्याबद्दल त्यांना धमकावण्यात आले होते असे सांगितले जात आहे. सदर प्रकरणातील संशयितांच्या यादीत माजी सरपंच, निवृत्त अधिकारी, आमदार रुबी मनोहरम आणि एका व्यावसायिकाचा समावेश आहे. आमदार रुबी मनोहरम आणि त्यांची माणसे जयकुमार यांना धमकावत होती. जयकुमार यांनी रुबी यांचा विजय निश्चित व्हावा यासाठी आर्थिक मदत केली होती. हे पैसे जयकुमार यांनी परत मागितले असता त्यांना धमकावण्यास सुरुवात झाली असे सांगण्यात येत आहे. जयकुमार यांनी रूबी यांच्यासाठी 70 लाख रुपये खर्च केले होते. या बदल्यात रूबी यांनी जयकुमार यांना ठेके देण्याचे आश्वासन दिले होते असा दावा जयकुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Topics mentioned in this article