तमिळनाडू: पाणीपुरी म्हणजे अनेकांचा आवडता पदार्थ. पाणीपुरीचा गाडा पाहिला की पाऊले आपोआप थांबतात. चौकात- गर्दीच्या ठिकाणी आपला गाडा लावून हे पाणीपुरीवाले आपला उदरनिर्वाह करत असतात. कुटुंबाचा सांभाळ होईल, इतकी या पाणीपुरीवाल्यांची कमाई असेल असं तुम्हालाही वाटत असेल, मात्र असं अजिबात नाही.
याचं कारण म्हणजे एका पाणीपुरीवाल्याचे PHONEPE आणि RAZORPA चे पेमेंट रॉकर्ड पाहून आयकर अधिकारी चक्रावले आहेत. त्यानंतर या पाणीपुरी विक्रेत्याला GST नोटीस पाठवण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूतील एका पाणीपुरी विक्रेत्याची वार्षिक कमाई तब्बल 40 लाख रुपये असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे जीएसटी विभागाकडून त्याला नोटीस मिळाली आहे. PhonePe आणि Razorpay च्या रेकॉर्डच्या आधारे GST नोटीस जारी करण्यात आली आहे. या पाणीपुरीवाल्याचे फक्त ऑनलाईन कमाई 40 लाख होती, त्यामुळे कॅशमध्ये ती किती असेल? याचा विचार करायला हवा.
या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “Razorpay आणि PhonePe कडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे, तुम्हाला वस्तू/सेवांच्या पुरवठ्यासाठी UPI पेमेंट मिळाले आहे आणि 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी मिळालेली देयकांची एकूण रक्कम 40,11,019 रुपये आहे. पुढील विश्लेषणावरून असे दिसून येते की तुम्ही संबंधित CGST कायदा, 2017 सह TGST कायदा, 2017 च्या तरतुदींखाली नोंदणी केलेली नाही.
नक्की वाचा - Narendra Modi: हिंदू सेनेचा विरोध मोदींनी झुगारला, अजमेर दर्ग्याबाबत एक निर्णय अन् लाखोंची मनं जिंकणार
TNGST/CGST कायदा, 2017 च्या कलम 22 च्या उप-कलम (1) नुसार, आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांची एकूण उलाढाल असलेला प्रत्येक पुरवठादार GST नोंदणीसाठी जबाबदार असणे आवश्यक आहे. पुढे, TNGST/CGST कायदा, 2017 च्या कलम 23 च्या उप-कलम (2) नुसार, सरकारने, 40 लाख रुपयांपर्यंतच्या वस्तूंच्या विशेष पुरवठ्यामध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला नोंदणी मिळविण्यापासून सूट दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world