चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो वायरस (HMPV) जलद गतीने पसरत आहे. चीनमध्ये या व्हायरसचा कहर वाढल्यानंतर आता भारतामध्येही याचा पहिल्या रुग्ण आढळला आहे. या वृत्तानंतर आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंगळुरूमध्ये HMPV चा पहिला रुग्ण आढळला असून एका आठ महिन्यांच्या बाळाला याची लागण झाली आहे. बंगळुरूच्या खासगी रुग्णालयात याबाबत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये या लहानगीला HMPV चं संक्रमण झाल्याचं समोर आलं. खाजगी रुग्णालयाने याबाबत चाचणी केली आहे. सरकारी रूग्णालयानं अद्याप याची टेस्ट केली नसल्याचं बंगळुरू आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा - Morning Walk vs Evening walk : कोणत्या वेळेस चालणे ठरेल फायदेशीर, सकाळी की संध्याकाळी?
चीनमध्ये HMPV व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. यादरम्यान दिल्ली आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत संपूर्ण तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी NMPV आणि श्वसनासंबंधित व्हायरसशी लढण्यासाठी नियमावली जारी केली आहे आणि रुग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लक्षणं काय आहेत?
HMPV या नव्या व्हायरसची लक्षणंही जवळपास कोरोनासारखीच आहे. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा श्वसनासंबंधित इतर कोणत्याही व्हायरसप्रमाणे आहे. या व्हायरसमध्ये सर्दी, खोकला सारखी सामान्य फ्लूची लक्षणं आढळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world