ITR Filing: आयटी रिटर्न भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवा! CBDT ला पत्राद्वारे केली विनंती

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, त्यामुळे 31 जुलैपर्यंत आयटीआर भरणे कठीण झाले आहे असं सीबीडीटीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे, 31 जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे, परंतु अजूनही अनेकांनी आयकर विवरणपत्र भरलेले नाहीये. त्यामुळे आयटी रिटर्न भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर्स (AIFTP) ने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडे केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठीचे आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठीची मुदत 1 महिन्याने वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे  मात्र, आयकर विभागाकडून आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्याबाबात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.  

ITR भरण्यात अडचण

ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघटनेने  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये पूर आला आहे, यामुळे आयकर विवरण सादर करण्यास बऱ्याच अडचणी येत  आहेत.  ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघटनेचे अध्यक्ष नारायण जैन आणि प्रत्यक्ष कर प्रतिनिधी समितीचे अध्यक्ष एसएम सुराणा यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसला पत्र लिहिले आहे. या निवेदनामध्ये असेही म्हटले आहे की, आयकर विवरण सादर करण्यासाठीची वेबसाईट आणि सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या उद्भवल्या असल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांमुळे आवश्यक फॉर्म डाउनलोड करण्यास आणि पडताळण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आयकर विवरण सादर करण्यासाठीच्या बँकेतील प्रक्रियेलाही यामुळे विलंब होत असून चलान मिळवण्यासाठीही उशीर होत असल्याचे म्हटले आहे. 

Advertisement

AIFTP ने CBDT ला विनंती केली आहे की करदाते आणि प्रॅक्टिशनर्सना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात यावी. ज्यामुळे आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल. आयकर विभागाने याबाबत आपली बाजू मांडताना म्हटले की त्यांना वेबसाईटशी निगडीत समस्यांबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी आयटी कंपन्यांशी सल्लामसलत करण्यात आली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article