टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे संस्थापक आणि CEO पावेल ड्यूरोव यांना शनिवारी सायंकाळी पॅरिसच्या बाहेरील बॉर्गेट विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. टीएफ1 टीव्ही आणि बीएफएम टीव्हीने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितनुसार ड्यूरोव आपल्या खासगी जेटने अजरबैजानच्या दिशेने निघाले होते. (Telegram messaging app founder and CEO Pavel Durov arrested)
एका पोलीस तपासाअंतर्गत अटकपत्र निघाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हा तपास टेलिग्रामवरील मॉडरेटरच्या कमतरतेवर केंद्रीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग अॅपवर गुन्हेगारीसंदर्भातील घटना कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू होत्या.
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित कंटेन्टचा प्रसार
टेलिग्रामने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्रान्सचे गृह मंत्रालय आणि पोलिसांनी अद्याप यावर काहीही सांगितलं नाही. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर बल्ला केल्यानंतर टेलिग्राम युद्धासंबंधित राजकारणावरुन दोन्ही पक्षांकडून आलेला अनफिल्डर्ड कंटेन्टचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरला होता. टेलिग्राम मेसेजिंग अॅप युक्रेनचे राष्ट्रपती झेलेस्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी देवाणघेवाणीचं सर्वात मोठं माध्यम आहे. क्रेमलिन आणि रशियन सरकारदेखील याचा वापर आपल्या बातम्या शेअर करण्यासाठी करतात.
नक्की वाचा - मलाही सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपावे लागले होते! सरन्यायाधीशांनी सांगितला धक्कादायक अनुभव
कोण आहेत पावेल ड्युरोव?
पावेल ड्युरोव हे टेलिग्राम ह्या जगप्रसिद्ध अॅपचे फाऊंडर आणि सीईओ
टेलिग्राम अॅपचे सीईओ, मालक असल्यामुळे अर्थातच अब्जाधीश
ड्युरोव सध्या दुबईत असतात, जन्माने ड्युरोव हे रशियन
2014 मध्ये पुतीन सरकारशी पंगा घेत रशिया सोडला
रशिया, यूक्रेनसह सोव्हिएत संघाचा भाग राहिलेल्या देशात टेलिग्राम प्रभावशाली
फेसबूक, युट्यूब, व्हॉटस अॅप, इंस्टाग्रामनंतर टेलिग्राम प्रसिद्ध
रशिया आणि यूक्रेन युद्धातलं 'अनफिल्डर्ड कंटेट'चा सर्वात मोठा सोर्स आहे टेलिग्राम
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किीसुद्धा टेलिग्रामचा कम्यूनिकेशनसाठी वापर करतात