जाहिरात

मलाही सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपावे लागले होते! सरन्यायाधीशांनी सांगितला धक्कादायक अनुभव

या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती केली. कामावर परतल्यानंतर कोणावरही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासनही न्यायालयाने दिले.  

मलाही सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपावे लागले होते! सरन्यायाधीशांनी सांगितला धक्कादायक अनुभव
सुप्रीम कोर्ट में हुई कोलकाता रेप-मर्डर केस पर सुनवाई
नवी दिल्ली:

कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या पाशवी लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खुनामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कोलकात्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला विविध राज्यांतील डॉक्टर्स आणि रुग्णालय कर्मचारी आंदोलन करून पाठिंबा देताना दिसत आहे. कोलकात्यातील प्रकरणाची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती केली. कामावर परतल्यानंतर कोणावरही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासनही न्यायालयाने दिले.  

नक्की वाचा: VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं?

मलाही रुग्णालयात जमिनीवर झोपावे लागले होते!

कोलकात्यातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी त्यांच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली.त्यांनी सांगितलेला अनुभव ऐकून कोर्टातील सगळेजण अवाक झाले होते. सरन्यायाधीशांनी म्हटले की, आंदोलन, संप करणाऱ्या डॉक्टरांनी कामावर परत रुजू व्हावे. आम्ही प्रशासनाला निर्देश देऊ की आंदोलन करमाऱ्या डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये. आम्हाला कल्पना आहे की डॉक्टर 36 तास काम करत आहेत. मी स्वत: सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपलो आहे. माझ्या घरातील एक व्यक्ती आजारी होती, तिला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 

नक्की वाचा :  काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा

जर डॉक्टरांनी कामच केले नाही तर...

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) नागपूरच्या निवासी डॉक्टरांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की घटनेच्या विरोधात विरोध प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टरांना त्रास दिला जात आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, कामावर परतल्यानंतर डॉक्टरांना त्रास दिला जाऊ नये यासाठी आम्ही प्रशासनाला योग्य ते निर्देश देऊ. जर डॉक्टर कामावर परतले नाही तर जन आरोग्य सेवा कशी चालणार ? तरीही जर डॉक्टरांना काही त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना न्याय देण्याचे काम करू मात्र डॉक्टरांनी पहिले कामावर परतावे असे न्यायालयाने म्हटले.  

नक्की वाचा: Kolkata Doctor Murder : 'तुमच्या बॉयफ्रेंडसोबत....', डॉक्टरांच्या आंदोलनावर खासदाराची जीभ घसरली

कोलकात्यातील प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने न्यायालयात म्हटले की कोलकाता पोलिसांनी मृत डॉक्टरच्या आईवडिलांना आधी सांगितले होते की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली होती. नंतर पोलिसांनी त्यांना सांगितले की ही हत्या होती. पीडितेच्या मित्रांनी या प्रकरणातील तथ्ये दडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता असेही सीबीआयने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणी बोलताना पोलिसांद्वारे करण्यात आलेली दिरंगाई ही अत्यंत व्यथित करणारी बाब असल्याचे म्हटले आहे. अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल होण्याआधीच पोलिसांनी पीडितेचे पोस्टमॉर्टेम केल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही बाब आश्चर्यचकीत करणारी असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.  

प्रकरण नेमके काय आहे?

कोलकात्यातील आर.की.कर सरकारी रुग्णालयामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत. रुग्णालयातच या डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा लहान मासा आहे, या डॉक्टरची अन्य काही कारणांमुळे हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. हे बडे मासे सापडत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,सदर प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी आंदोलन करणाऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी कोलकात्यासह देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने केली जात आहेत. यामुळे अनेक भागातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम होताना दिसत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com