Terrorists Attack : दहशतवाद्यांचा नवीन पॅटर्न; जम्मूमध्ये का वाढत आहेत हल्ले?

Terrorist Attacks: जम्मू शांत वातावरणासाठी परिचित आहे. मात्र मागील काही दिवसात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे तेथील शांती भंग झाली आहे. हे सर्व हल्ले मध्यवर्ती जिल्हे पुंछ, राजौरी, डोडा आणि रियासीमध्ये झाले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

नवीन जागा, नवीन टार्गेट आणि एकामागून एक हल्ले हा दहशताद्यांचा नवीन पॅटर्न समोर आला आहे. मागील एका महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये 7 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये दहशतवाद्यांनी सैन्यासोबत सामान्य नागरिकांनाही टार्गेट केलं. दहशतवाद्यांना काश्मीर खोरं सोडून जम्मूवर लक्ष्य का केंद्रीत केलं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

जम्मू शांत वातावरणासाठी परिचित आहे. मात्र मागील काही दिवसात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे तेथील शांती भंग झाली आहे. हे सर्व हल्ले मध्यवर्ती जिल्हे पुंछ, राजौरी, डोडा आणि रियासीमध्ये झाले आहेत. 

(नक्की वाचा- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला बनियान घालून आला, न्यायमूर्ती म्हणाल्या 'हाकला याला')

मागील काही वर्षांमध्ये भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात आपली पकड मजबूत केली आहे. दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीच्या घटनांमध्येही यामुळे घट झाली आहे. काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना देखील कमी झाल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींमुळे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना अस्वस्थ वाटत असावं. त्यामुळेच दहशतवाद्यांनी नवीन लक्ष्य निवडल्याचं बोललं जात आहे. दहशतवादाला पाकिस्तानातून खतपाणी मिळत असावं म्हणूनच जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हल्ले वाढले आहेत. 

डोडा जिल्ह्यातील गंदोह परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. 26 जून रोजी झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांना राजौरी येथील सैन्याच्या एका छावणीला लक्ष्य केलं होतं. 9 जून रोजी दहशतवाद्यांना भाविकांच्या बसला देखील निशाणा बनवलं होतं. यामध्ये 9 जणांना मृत्यू झाला होता. तर 41 जण जखमी झाले होते. 

Advertisement

(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा, काय आहे कारण?)

महिनाभरातील मोठे दहशतवादी हल्ले

8 जुलै 2024

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील माचेडी परिसरात सोमवारी दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला. ज्यामध्ये ज्युनिअर कमिशन अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद झाले. तर काही जवान जखमी झाले आहेत. 

7 जुलै 2024

राजौरी जिल्ह्यातील मंजाकोट परिसरात गुलाठी गावात प्रादेशिक सेनेच्या छावणीवर पहाटे 4 वाजता गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला होता. 

Advertisement

26 जून 2024

डोडा जिल्ह्यातील गंडोह परिसरात भारतीय सैनिकांनी 3 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. सर्च ऑपरेशननंतर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांना गोळीबार झाला. 

12 जून 2024

डोडा जिल्ह्यात 2 दहशतवादी हल्ले झाले. ज्यामध्ये 5 जवान आणि एसपीओ जखमी झाले होते. 

11 जून 2024

कठुआमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. तर दोन दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला होता.

9 जून 2024

जम्मूच्या शिवखोडीमध्ये तीर्थयात्रेला आलेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांना हल्ला केला होता. ज्यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाला होता. 

Topics mentioned in this article