सर्वोच्च कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोखेचा डेटा आपल्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे. हा डेटा त्यांना एसबीआयकडून मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 763 पानांची दोन यादी टाकण्यात आली आहे. एका यादीत निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची माहिती आणि दुसऱ्या यादीत राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांची सविस्तर माहिती आहे. या कंपन्या आणि प्रमोटर्सची प्रोफाइट महत्त्वपूर्ण ठरत आहे.
फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
ही कंपनी सँटियागो मार्टिन याने १९९१ मध्ये सुरू केली होती. मार्टिनला लॉटरीचा किंग म्हणून ओळखले जाते. या कंपनीने 1386 कोटींचे रोखे दान स्वरुपात दिले आहेत आणि हा आकडा सर्वाधिक आहे. मार्टिन वयाच्या 13 व्या वर्षी लॉटरीच्या जगात आले. मार्केटिंगच्या ताकदीवर त्यांनी संपूर्ण देशात लॉटरी खरेदी-विक्रीचं मजबूत नेटवर्क तयार केलं. मार्टिनच्या लॉटरी व्यवसायाची सुरुवात तमिळनाडूपासून झाली. मात्र तमिळनाडूमध्ये लॉटरीवर बंदी आणल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय केरळ आणि कर्नाटकमध्ये पसरवलं. फ्यूचर गेमिंग सध्या भारतातील 13 राज्यांत व्यवसाय करते. कंपनीत एक हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
966 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी करणारी मेघा इंजिनिअरिंग ही तेलंगणातील हैद्राबाद येथील दिग्गज कंपनी आहे. याची सुरुवात पमीरेड्डी पिची रेड्डी यांनी 1989 मध्ये केली होती. 1991 मध्ये पीवी कृष्णा रेड्डी हे कंपनी चालवित होते. कंपनीने तेलंगणा सिंचनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रकल्पावर काम केलं आहे. या कंपनीला हिमाचलमध्ये जोजिला बोगदा निर्मितीचं कंत्राट मिळालं होतं. मेघा इंजिनिअरिंगची उपकंपनीही आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेकला तब्बल 3000 बसेसचं कंत्राट मिळालं होतं. गेल्या वर्षी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 5000 कोटींची ऑर्डरही मिळाली होती.
क्विक सप्लाई चेन प्रायवेट लिमिटेड
महाराष्ट्र स्थित कंपनी क्विक सप्लाय चेनने 410 कोटींची निवडणूक रोखे खरेदी केली. कंपनीच्या तीन प्रमुखांपैकी एकाचं नाव तपस मिश्रा आहे. तपस हे रिलाइन्स ऑईल अँड पेट्रोलियम, रिलायन्स इरॉस प्रॉडक्शन, रिलायन्स फोटो फिल्म, रिलायन्स फायर ब्रिगेड, रिलायन्स पॉलिस्टरमध्येही प्रमुख आहेत. त्यांच्या लिंक्डीन प्रोफाइलनुसार तपस मिश्रा हे अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रिज या कंपनीच्या अकाऊंट विभागाचे प्रमुख आहेत.
हल्दिया एनर्जी लिमिटेड
हल्दिया एनर्जी संजीव गोयंका ग्रुपचा एक भाग आहे. कंपनीने 377 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. कंपनी ऊर्जा, ऊर्जा, नेत्र सेवा, FMCG आणि मीडिया क्षेत्रात व्यवसाय करते. संजीव गोयंका हे आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सचे मालकही आहेत.
वेदांता लिमिटेड
वेदांता ही दिग्गज व्यावसायिक अनिल अग्रवाल यांची कंपनी आहे. ही कंपनी मायनिंग क्षेत्रात काम करते. कंपनीने घेतलेले कर्ज आणि पर्यावरणसंबंधित मुद्द्यांवरुन वादात होती. कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे. या कंपनीने तब्बल 376 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत.
एस्सेल माइनिंग अँड इंडस्ट्रीज़ लिमिटेड
एस्सेल माइनिंग आदित्य बिरला ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीने तब्बल 225 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले. करोड़ रुपये के इलेक्टोरल बॉन्ड खरीदे हैं. कंपनी लोहखनिज आणि उत्खननाचा व्यवसाय करते.
वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी
वेस्टर्न यूपी पॉवर कंपनी गेल्या 15 वर्षांपासून इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाण्याच्या व्यवसायात आहे. निवडणूक रोखे खरेदी करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी मेघा ग्रुपचा या कंपनीत कंट्रोलिंग भागीदारी आहे. कंपनीने तब्बल 220 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत.
भारती एअरटेल लिमिटेड
भारती एअरटेल ही टेलीकॉम सेक्टरमध्ये काम करणारी मोठी कंपनी आहे. कंपनीचं मुख्यालय दिल्लीत आहे आणि कंपनीने तब्बल 198 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. कंपनीने आपला व्यवसाय 1995 साली भारतात सुरू केला. कंपनीचे मालक सुनील मित्तल आहेत. सध्या कंपनी तब्बल 18 देशांमध्ये व्यवसाय करीत आहे.
केवेंटर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड
कलकत्ताची कंपनी केवेंटर फूड पार्क इन्फ्रा कंपनी फूड प्रोसेसिंगच्या व्यवसायात आहे. कंपनी कृषी साहित्याचीही निर्यात करते. कंपनीने तब्बल 195 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत.
एमकेजे एंटरप्रायजेस लिमिटेड
192 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी करणारी कलकत्त्याची कंपनी एमकेजे एंटरप्रायजेस स्टीलच्या व्यवसायात आहे. महेंद्र कुमार जालान हे कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. ते इतर अनेक कंपन्यांमध्येही डायरेक्टरच्या पदावर आहेत.