तुम्ही रेल्वेनं प्रवास करताना अनेक लहान-मोठी स्टेशन पाहिली असतात. मुंबईकरांसाठी तर रेल्वे लाईफ लाईन आहे. मुंबईच्या लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे ही स्टेशन कायम गजबजलेली असतात. देशातील सर्व भागांना जोडणारं माध्यम अशी रेल्वेची ओळख आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ते रेल्वे स्टेशन इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. हे रेल्वे स्टेशन वर्षातील 350 दिवस एकदम रिकामं असतं. याकाळात इथं कोणतीही रेल्वे थांबत नाही. एकही प्रवासी उतरत नाही. वर्षतील फक्त 15 दिवस या स्टेशनवर रेल्वे थांबतात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अनुग्रह नारायण रोड घाट स्टेशनवर फक्त 15 दिवस प्रवासी रेल्वे थांबतात. पितृपक्षात गयामध्ये श्राद्धापूर्वी पिंडदान करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात लोकं येता. ते त्यांच्या पितृकांना प्रथम श्राद्ध अर्पण करतात.
यंदा कधीपासून थांबणार रेल्वे?
रेल्वे विभागानं यंदा 17 सप्टेंबरपासून इथं रेल्वे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे इथं यंदाही देशभरातून प्रवासी पिंडदानासाठी येत आहेत. पण, जिल्हा प्रशासनानं त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
पुनपून नदीमध्ये श्राद्ध करण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरुंच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था इथं नाही. त्याचबरोबर इथं यात्रेकरुंसाठी तिकीट काऊंटरही नाही. येथील रस्त्यांची अवस्थाही अतिशय खराब आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक रंजन कुमार यांनी दिली. रस्ते चांगले होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं येणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे पाणी आणि चेंजिंग रुम असणे गरजे आहे. त्याचबरोबर यात्रेकरुंना आणखीही बऱ्याच सुविधांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )
हे रेल्वे स्टेशन सुरु झालं त्यावेळी रेल्वेकडून सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असे. पण, हळू-हळू सर्व काही बंद झालं. औरंगाबाद जिल्हा प्रशासनही याबाबत उदासीन दिसत आहे. अर्थात यात्रेकरुंना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world