रील स्टार बनवून प्रसिद्ध होण्याच्या नादात एक तरुणी तुरुंगात पोहोचली आहे. रील बनवण्यासाठी कॅमेरा विकत घेण्यासाठी 30 वर्षीय तरुणीने दागिन्यांची चोरी केली. पोलिसांनी चोरीप्रकरणी तिला अटक केली आहे. नीतू यादव असं अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, नीतू दिल्लीतील द्वारका येथे घरकाम करत होती. नीतूने 15 जुलै रोजी ज्या घरात काम करत होती तिथेच चोरी केली. दोन सोन्याच्या बांगड्या, एक चांदीची चेन आणि एक चांदीची पैंजण चोरून ती फरार झाली. मालकाच्या तक्रारीनंतर पोलीसांनीही वेगाने तपास सुरु केला.
(नक्की वाचा - 'मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे', ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्याला बेड्या)
पोलिसांनी नीतूच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला, मात्र बंद होता. तिचा पत्ताही बनावट असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मदतीने तिचा शोध घेतला. त्यावेळी दिल्लीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला अटक करण्यात आली. नीतून दिल्लीतून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्नात होती. बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तिला अटक केली.
(नक्की वाचा- कुंभे धबधब्यावर रिल स्टार गेली, पाय घसरून 300 फूट खोल दरीत कोसळली, पुढे काय झालं?)
पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीदरम्यान तिने सांगितले की, तिने एक YouTube चॅनेल बनवले आणि इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. कोणीतरी तिला व्हिडिओ बनवण्यासाठी DSLR कॅमेरा घेण्याचा सल्ला दिला. कॅमेऱ्याची किंमत लाखोंची असल्याचे समजताच तिने नातेवाइकांकडे कर्ज मागितले मात्र सर्वांनी तिला नकार दिला. त्यावेळी तिने चोरी करण्याचा कट रचला.
याशिवाय नीतू यादवने सांगितले की ती तिच्या लग्नात खूश नव्हती. त्यामुळेच ती राजस्थानातून दिल्लीत आली होती. पोलिस तपासात नीतूचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे समोर आले आहे.