Railway Accident : साबरमती एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरुन घसरले, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

Sabarmati Express Derail: अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कानपूरच्या गोविंदपुरीसमोर ही दुर्घटना घडली.

Advertisement
Read Time: 2 mins

वाराणसीहून अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कानपूरच्या गोविंदपुरीसमोर ही दुर्घटना घडली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचे 20 डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. रेल्वे, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

(नक्की वाचा- देशातील 22 आधिकारी बोगस? पूजा खेडकर प्रकरणानंतर विजय कुंभार यांचा मोठा दावा)

अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नसल्याचे वृत्त आहे. मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम करत आहेत.

अपघाताचे कारण शोधण्यासाठी रेल्वे तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. रेल्वे रुळांची प्राधान्याने दुरुस्ती करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा सविस्तर तपास केल्यानंतरच या अपघातामागील कारणे स्पष्ट होणार आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)

घटनेनंतर डीआरएम, एडीआरएम, कमर्शियल हेड, टेक्निकल हेड, मेडिकल टीमसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मदतकार्य सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आज पहाटे 02.35 वाजता कानपूरजवळ ट्रॅकवर ठेवलेल्या वस्तूला आदळल्याने रुळावरून घसरले. काही खुणा दिसून आल्या आहेत. आयबी आणि यूपी पोलिसही यावर काम करत आहेत. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

Advertisement