- भारतात होळीचा सण पाच दिवस साजरा केला जात असून देशभर परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या सणाचा अनुभव घेतात
- ओडिशा येथील पुरीमध्ये नेदरलँड्सच्या पर्यटकांनी स्थानिकांसोबत होळी उत्सवात साजरा केला
- नेदरलँड्सच्या पर्यटकांनी या सांस्कृतिक अनुभवाला अविस्मरणीय मानले आणि सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली
भारतात होळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. रंगांचा हा सण पाहण्यासाठी परदेशातील पर्यटक या काळात भारतात मोठ्या प्रमाणात येत असतात. कुणी उत्तर भारत तर कुणी दक्षिण भारताला या काळात भेट देतात. मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या ही मोठी असते. त्याच वेळी ओडिशातील पुरी जगन्नाथ इथला होळी उत्सही मोठी असतो. इथं ही परदेशी पर्यटक येतात. त्यात नेदरलँड्सच्या पर्यटकांना या ठिकाणी आलेला अनुभव वेगळा होता. त्यांनी त्याबाबत आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यांची ही प्रतिक्रीया आता सगळीकडे व्हायरल ही होत आहे. त्यांनी भारताबाबतचे मत यात व्यक्त केले आहे.
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या परिसरात नेदरलँड्सच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांसोबत उत्साहात होळी साजरी केली. 'आयुष्यात एकदाच मिळणारा हा अविस्मरणीय अनुभव आहे,' अशा शब्दांत या पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 3 मार्च रोजी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये विदेशी पाहुणे भारतीय संस्कृती आणि रंगांमध्ये न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले. यातून सांस्कृतिक देवाणघेवाण होते असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. श्री जगन्नाथ मंदिराच्या परिसरात पर्यटकांनी एकमेकांना गुलाल लावला. त्यांच्यासाठी हा अनुभव फार वेगळा होता.
रंग लावल्यानंतर त्यांनी स्थानिकांसोबत नाचत हा सण साजरा केला. एका महिला पर्यटकाने सांगितले की, "इतके आनंदी लोक एकत्र पाहणे हा एक अद्भूत अनुभव आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते." असं या पर्यटक महिलेने सांगितलं आहे. एकीकडे पुरीमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे वृंदावनमध्ये एका ऑस्ट्रियन महिलेला मात्र त्रासाला सामोरे जावे लागले. रंगांसोबत डोळ्यात खडे गेल्याने तिला अनेक दिवस दृष्टीदोष जाणवत होता. सणांच्या काळात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एका ऑस्ट्रियन पर्यटकेने मात्र वृंदावनमधील आपला अनुभव वेदनादायी असल्याचे सांगितले. रंगांमध्ये छोटे दगड मिसळले गेल्याने तिच्या डोळ्यांना इजा झाली. ज्यामुळे या आनंदाच्या उत्सवावर काहीसे विरजण पडले. हा आनंदाचा खेळ आहे. त्यामुळे तो आनंदाने खेळला पाहीजे. मात्र तसं झालं नाही याचं दुख आहे असं या ऑस्ट्रीयन पर्यटकाने म्हटले आहे. भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना चांगल्या सोबत काही वाईट अनुभव ही येत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईत ही एका ब्रिटीश महिलेसोबत चुकीचं वर्तन झाल्याचं नुकतचं समोर आलं होतं. त्याबाबतचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर भारत आणि मुंबई यांच्याबाबत नकारात्मक प्रतिक्रीया आल्या होत्या.
#WATCH | Puri, Odisha: Foreign tourists celebrated the festival of Holi with great enthusiasm in Puri, near the renowned Sri Jagannath Temple. pic.twitter.com/afMX6KSwjJ
— ANI (@ANI) March 3, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world