जाहिरात

Trending News: व्हॅलेंटाईन वीकमध्ये हे काय घडलं, प्रियकरा समोरच प्रेयसीने नको ते केलं, शेवटी जे झालं ते...

व्हॅलेंटाईन वीक निमित्त या जोडप्यामध्ये काहीतरी चर्चा झाली होती. मात्र प्रियकराने ऐनवेळी नकार दिल्याने ही तरुणी आक्रमक झाली.

Trending News: व्हॅलेंटाईन वीकमध्ये हे काय घडलं, प्रियकरा समोरच प्रेयसीने नको ते केलं, शेवटी जे झालं ते...
  • उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील तरुणीने प्रियकराच्या वचनभंगामुळे सरयू नदीत आत्महत्येचा प्रयत्न केला
  • तरुणी पुलावरून नदीत उडी घेतल्यावर तिथे उपस्थित मच्छिमारांनी तिला वेळेत वाचवले
  • प्रियकराने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने झालेल्या वादामुळे तरुणीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरू आहे. प्रेमी युगूलांसाठी हा विक म्हणजे पर्वणीच समजला जातो. एकीकडे देशात सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे. त्याच वेळी एक खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात समोर आली आहे.  प्रेमातील टोकाच्या पाऊलाची ही घटना आहे. प्रियकराने दिलेले वचन मोडल्याने संतापलेल्या एका तरुणीने सरयू नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मऊ आणि गोरखपूर सीमेवर असलेल्या दोहरीघाट येथील पुलावरून या तरुणीने नदीत उडी मारली. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या मच्छिमारांनी तिला वेळेत पाण्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रियकराने वचनपूर्ती न केल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 'व्हॅलेंटाईन वीक' दरम्यान प्रियकराने तिला काहीतरी आश्वासन दिले होते, मात्र त्याने ते पूर्ण केले नाही. याच वादातून संतप्त झालेल्या तरुणीने थेट नदी गाठली आणि उडी घेतली. ती पाण्यात बुडत असताना पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला. जवळच असलेल्या मच्छिमारांनी तातडीने नाव तिकडे नेली. बुडणाऱ्या तरुणीला जीवदान दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा - Nagpur News: 11 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, Video ही काढला, 12 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य

व्हॅलेंटाईन वीक निमित्त या जोडप्यामध्ये काहीतरी चर्चा झाली होती. मात्र प्रियकराने ऐनवेळी नकार दिल्याने ही तरुणी आक्रमक झाली. संतापाच्या भरात तिने थेट नदीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. जर मच्छिमारांनी तत्परता दाखवली नसती, तर या रागाचे रूपांतर मोठ्या शोकांतिकेत झाले असते. मच्छिमारांनी तिला सुरक्षित बाहेर काढून तिच्या घरी सोडले आहे. लोकांकडून या धाडसी मच्छिमारांचे कौतुक होत आहे. पण या घटनेची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. शिवाय तिचा व्हिडीओ ही सर्वत्र व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Pune News: 'राजकारण खूप खराब!', हात जोडले, डोळे पाणावले, रिलस्टार सरपंचांनी पराभवाचे कारण सांगितले

या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये तरुणी नदीच्या पात्रात बुडताना दिसत असून मच्छिमार तिला बाहेर काढताना दिसत आहेत. वेळेत मदत मिळाल्याने तरुणी सुरक्षित असून मच्छिमारांनी तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. तरुणांनी प्रेमात टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करावा, असे आवाहन स्थानिकांकडून केले जात आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येच हा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com