Tamil Nadu Election: तृषा कृष्णनचीही राजकारणात एन्ट्री? विजयच्या जागेवर निवडणूक लढण्याची चर्चा

Trisha Krishnan to Enter Politics: अभिनेत्री तृषा कृष्णन विजय यांनी रिक्त केलेल्या तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Trisha Krishnan to Enter Politics: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत धडाक्यात झाली आहे. त्यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकून सर्वांना चकित केले आहे. विजय यांच्या या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आता चित्रपटसृष्टीतील त्यांची सहकारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून तृषाला संधी?

मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांनी पेरांबूर (चेन्नई) आणि तिरुचिरापल्ली पूर्व अशा दोन मतदारसंघातून विजय मिळवला आहे. नियमानुसार, त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विजय हे पेरांबूरची जागा स्वतःकडे ठेवण्याची शक्यता असून, तिरुचिरापल्ली पूर्व ही जागा ते सोडू शकतात. याच जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी टीव्हीकेचे नेते तृषा कृष्णन हिने निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही असल्याचे समजते.

Advertisement

(नक्की वाचा-  Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)

तृषाची भूमिका काय?

विजय आणि टीव्हीकेच्या वरिष्ठ नेत्यांनी तृषाला पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली असल्याची चर्चा आहे. मात्र, तृषाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याने ती सध्या या निर्णयाबाबत साशंक आहे. तिने अद्याप या प्रस्तावाला होकार दिलेला नाही, असंही समजतंय. जर तृषाने ही ऑफर स्वीकारली, तर तमिळनाडूच्या राजकारणातील हे एक मोठे ग्लॅमरस वळण ठरेल.

(नक्की वाचा-  Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात)

विजय यांचा सत्तास्थापनेचा पेच

विजय यांचा पक्ष 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी 118 जागा लागत असून त्यांना अजून 10 जागांची गरज आहे. टीव्हीके 10 जागांसाठी काँग्रेस किंवा इतर लहान पक्षांची मदत घेऊ शकते. काही चर्चांनुसार डीएमके (59 जागा) किंवा एआयएडीएमके (47 जागा) यांच्याशीही युतीचे पर्याय खुले आहेत.

Topics mentioned in this article