राजस्थानच्या जयपूरमधून भीषण आगीची घटना समोर आली आहे. पेट्रोला पंपाजवळ लागलेल्या या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या केमिकलने भरलेल्या टँकरला लागलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडली. काही वेळातच ही आग पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीच प्रयत्न सुरू आहेत. आगीचे उंचच उंच लोळ आणि धुराचे लोट दुरून दिसत होते. या घटनेनंतर महामार्गावरील वाहूतक ठप्प झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी घडली दुर्घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास भांकरोटा डी क्लॉथोंनजवळ दोन ट्रकचा धडक झाली. ज्यानंतर सीएनजीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट घेतला. या आगीच्या भक्षस्थानी अनेक वाहने देखील आली. या आगीत प्रवाशांनी भरलेली बसही जळून खाक झाली. काही जणांनी वेळीच बसमधून उतरून आपला जीव वाचवला. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. जखमी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)
(नक्की वाचा - बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य वाहनांना धडकणारा ट्रक केमिकलने भरलेला होता. त्यामुळे आग पसरल्याने अनेक ट्रक जळून खाक झाले.या घटनेनंतर जयपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. थोड्याच वेळात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा घटनास्थळी पोहोचणार आहेत.