Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात एका 2 वर्षांच्या चिमुकल्याला रेबीजमुळे आपला जीव गमवावा लागला. सुमारे एक महिन्यापूर्वी मोकाट कुत्र्याने मुलाच्या पायावरील जखमेला चाटले होते. ज्याकडे कुटुंबाने दुर्लक्ष केले. याच दुर्लक्षामुळे मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी मोहम्मद अनीस यांचा दोन वर्षांचा मुलगा मोहम्मद अदनान याच्या पायावर जखम झाली होती. एक महिन्यापूर्वी एका मोकाट कुत्र्याने मुलाच्या पायावरील त्या जखमेला चाटले होती. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांना वाटले की, फक्त चाटल्यामुळे काही होणार नाही. पण ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.
(नक्की वाचा- Crime News : सौंदर्याने झाला वेडापिसा; विद्यार्थ्याने शिक्षिकेला घरात घुसून जाळलं)
कुत्रा चावून किंवा चाटून रेबीजचे विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्याची लक्षणे दिसायला काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. अदनानच्या बाबतीतही असेच झाले. शनिवारी त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्याला ‘हायड्रोफोबिया' म्हणजेच पाण्याची भीती जाणवू लागली. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली. मुलाची अवस्था पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. पण तिथे त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. अखेर त्याला सोमवारी रुग्णालयातून घरी आणले असता त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- VIP प्रोटोकॉलमुळे मृतदेहाची सात तास हेळसांड! छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना)
चिमुकल्याच्या मृत्यूनंतर गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुमारे 30 गावकऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात जाऊन अँटी-रेबीज लस घेतली. डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, "लोकांनी कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यास किंवा चाटल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. रेबीज एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. अशावेळी तात्काळ अँटी-रेबीज लस घेणे अत्यंत आवश्यक आहे."