Uber ड्रायव्हरने तरुणीला कॉलेजला सोडलं,पण नंतर घडला विचित्र प्रकार, मुलीनं WhatsApp चे स्क्रीनशॉट केले व्हायरल

Uber Driver Whatsapp Chat Viral : कॅब ड्रायव्हर आणि राईड बुक करणाऱ्या कस्टमरचं नातं प्रवास सुरु होण्यापासून ते प्रवास संपेपर्यंतच असतं. पण एका ड्रायव्हरने तरुणीला व्हाट्सअॅपवर विचित्र मेसेज केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Uber Driver Viral News
मुंबई:

Uber Driver Whatsapp Chat Viral : कॅब ड्रायव्हर आणि राईड बुक करणाऱ्या कस्टमरचं नातं प्रवास सुरु होण्यापासून ते प्रवास संपेपर्यंतच असतं. पण राईड संपल्यानंतर जर कोणी कॅब ड्रायव्हर कोणत्याही महिला कस्टमरला तिच्या परवानगीशिवाय मेसेज करत असेल, तर ती एक चिंतेची बाब आहे. एका कॅब ड्रायव्हरने तरुणीला तिच्या पर्सनल नंबरवर चुकीचा मेसेज केला. 'तुम्ही मला पसंत आहेत', असं मेसेज या ड्रायव्हरने तरुणीला पाठवला. त्यानंतर तरुणीने चॅट वाचलं आणि त्या ड्रायव्हरला त्वरीत ब्लॉक केलं. चॅटिंगचा स्क्रीनशॉट रेडिटवर व्हायरल करण्यात आला आहे. ड्रायव्हरने तरुणीला चुकीचे मेसेज पाठवल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तरुणी नेहमीप्रमाणे उबर कॅबने प्रवास करत होती, पण नंतर घडलं..

या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय की, उबर ड्रायव्हर जेव्हा सकाळी एका तरुणीला कॉलेजमध्ये सोडतो आणि नंतर तिच्या पर्सनल नंबरवर चुकीचा मेसेज करतो. 'तुम्ही मला पसंत आहेत, म्हणून मी मेसेज केला..',अशाप्रकारचं चॅट ड्रायव्हरने तरुणीसोबत केलं आहे. कॅब ड्रायव्हरने चुकीचं मेसेज केल्यानंतर तरुणीने त्याला लगेच ब्लॉक केलं. रेडिट यूजरने चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हटलंय, माझी मैत्रिण नेहमीप्रमाणे उबर कॅबने कॉलेजला जात होती. त्यानंतर उबर ड्रायव्हरने तिचा नंबर घेतला आणि तिला चुकीचे मेसेज केले.

नक्की वाचा >> यशस्वी जैस्वाल OUT की NOT OUT? अंपायरने केलं मोठं ब्लंडर..नेमकी चूक कोणाची? Video ने उडवली खळबळ

व्हाट्सअॅप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये कॅब ड्रायव्हर मुलीला हाय बोलतो आणि मैत्री करण्यासाठी विचारतो. हा तोच व्यक्ती असतो, ज्याने तिला उबर कॅबमधून कॉलेजला सोडलेलं असतं. मुलीला इम्प्रेस करण्याच्या हेतूनं स्वत:ला तो ड्रायव्हरऐवजी टूर एंड ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक असल्याचं सांगतो. तो चॅट करतो की,तुम्ही मला पसंत आहेत. म्हणून मी तुम्हाला मेसेज केला.

Creepy message from an uber cab driver/owner in India:
byu/Jealous-Werewolf5960 innoida

कॅब ड्रायव्हरच्या अशा वागणुकीमुळे तरुणी संतापते आणि त्याला ब्लॉक करते.@Jealous-Werewolf5960 नावाच्या रेडिट पेजवर एका यूजरने म्हटलं, भारतात एक उबर कॅब ड्रायव्हर किंवा मालकाचा चुकीचा मेसेज. दुसऱ्या यूजरने म्हटलंय, मला वाटलं की उबर आमचा डेटा लपवतो. म्हणून मी याचा वापर करतो. इनड्राईव्ह किंवा रॅपिडो वापरताना माझा पर्सनल नंबर सार्वजनिक होतो. यामुळे मी आता याचा वापर करणार नाही.

Advertisement

नक्की वाचा >> 'तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो..', पोलिसाने शेताच्या बांधावरच शेतकऱ्याला धमकी दिली अन्..बीडचा Video व्हायरल