
आकाश सावंत, प्रतिनिधी
Police vs Farmer Beed Viral Video : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानडी घाट परिसरात पवनचक्की प्रकल्पासाठी विद्युत टॉवर उभारण्यात आला आहे. पण या टॉवरखालील काही नट-बोल्ट स्थानिक शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं माहिती उघड झाली. त्यानंतर पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणीसाठी घटनास्थळी धाव घेतली. नट बोल्ट काढल्याने टॉवर कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी 12 वर संपर्क साधत पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो, अशी धमकी एका पोलिसाने शेतकऱ्याला दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
कानडी घाट येथील परिसरातील शेतात पोलिसांनी टॉवरची पाहणी केली. यावेळी टॉवरचे नटबोर्ड काढून टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पण याचदरम्यान, काही शेतकऱ्यांनी पवनचक्की कर्मचाऱ्यांना हे नट बोल्ट लावू देण्यास नकार दिला. हे नटबोर्ड नेमकी कोणी काढले आणि कशासाठी काढले? याचा तपास पोलिसांनी सुरु केला. हे शेत तुझं आहे का? सातबारा दाखव, असं पोलिसांनी शेतकऱ्याला विचारलं. त्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचवेळी एका पोलिसाने रागाच्या भरात शेतकऱ्याला धमकी दिली. “तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो” असा धमकीवजा इशाराच पोलिसाने शेतकऱ्याला दिला.
नक्की वाचा >> वर्षभरात 30000 तरुणांना नोकऱ्या, अन् 11500 लोकांना..कांदिवलीच्या 'या' कौशल्य विकास केंद्राने केलंय तरी काय?
तपासानंतर गुन्हा दाखल होणार?
या घटनेनंतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे.दुसरीकडे पोलिस प्रशासनाने टॉवरवरील नट कोणी काढले याचा तपास सुरू केल्याचं म्हटलं आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.मात्र धमकी दिलेल्या पोलिसावर कारवाई होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या व्हिडिओमुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील तणावाचं वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
नक्की वाचा >> Video: प्रसिद्ध मॉडेलने 'त्या' कॉलेजमध्ये केला अश्लील डान्स! विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे नको ते घडलं...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world