Udaipur Files : 'उदयपूर फाइल्स' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रतीक्षाच, नेमका काय आहे वाद?

Udaipur Files controversy : 'उदयपूर फाइल्स' हा चित्रपट राजस्थानमधील टेलर कन्हैया लालच्या हत्येवर आधारित आहे. 12 जून 2022 रोजी मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौस यांनी कन्हैयाची धारदार शस्त्राने हत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

उदयपूर फाइल्स (Udaipur Files Movie) चित्रपट सध्या तरी प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाच्या निर्मात्याला सर्वोच्च कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे सध्या तरी चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान चित्रपट निर्मात्यांना केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे.  

21 जुलैपर्यंत सुनावणी टळली...

कोर्टाने उदयपुर फाइल्स - कन्हैया लाल टेलर मर्डर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 जुलैपर्यंत टळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट उदयपुर फाइल्सच्या विरोधात आक्षेपार्हावर सुनावणी करीत असलेल्या केंद्राच्या समितीशी संबंधात तातडीने निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

नक्की वाचा - Yemen Nimisha Priya : भारताच्या कूटनीतीला मोठं यश, निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

काय आहे प्रकरण?

'उदयपूर फाइल्स' हा चित्रपट राजस्थानमधील टेलर कन्हैया लालच्या हत्येवर आधारित आहे. 12 जून 2022 रोजी मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौस यांनी कन्हैयाची धारदार शस्त्राने हत्या केली. दोन्ही आरोपींनी एक व्हिडिओ जारी केला आणि हत्येचे कारणही सांगितले. त्यांचं म्हणणं होतं की, माजी माजी भाजप नेता नूपुर शर्माने प्रोफेट मोहम्मदविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जे कन्हैयानेही शेअर केलं होतं. यासाठी दोघांनी कन्हैयाची हत्या केली. 
 

Advertisement

उदयपूर फाईल्सवर कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद...

उदयपूर फाईल्स हा चित्रपट द्वेषपूर्ण भाषणांनी भरलेला आहे. या ⁠चित्रपटात हिंसा आणि होमोसेक्सुएलिटी आहे. हा चित्रपट कधीही प्रसिद्ध होऊ नये. न्यायाधीशांनी हा चित्रपट पाहावा. हे धक्कादायक असून चित्रपटातून हिंसाचार पसरवला जात आहे. चित्रपटात समलैंगिकता दाखविली जातेय, एका संपूर्ण समुदायाची बदनामी केली जात आहे. हा विभाजनकारी आणि सांप्रदायिक अजेंडा आहे. 

Topics mentioned in this article