जाहिरात

Yemen Nimisha Priya : भारताच्या कूटनीतीला मोठं यश, निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

गेल्या अनेक दिवसांपासून निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेच्या स्थगितीची मागणी केली जात होती. अखेर भारताच्या कूटनीतीला मोठं यश आलं आहे.  

Yemen Nimisha Priya : भारताच्या कूटनीतीला मोठं यश, निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

यमनमधील (Yemen News) एका नागरिकाच्या हत्येचा आरोप प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या निमिषा प्रिया प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. केरळच्या पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेली निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. अखेर भारताची कूटनीती यशस्वी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमिषा प्रिया हिच्या फाशीच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी मागणी केली जात होती. अखेर भारताच्या कूटनीतीला मोठं यश आलं आहे आणि तिच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. (Nimisha Priya's Execution In Yemen Postponed)

कोण आहे निमिषा?
केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तेथे गेली होती असे सांगितले जाते, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला तिने यमनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवसरात्र काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले. निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Different news: रशियन महिला, 8 वर्षे बंगळुरूच्या गुहेत, 2 मुलींना तिथेच जन्मही दिला, पण...

नक्की वाचा - Different news: रशियन महिला, 8 वर्षे बंगळुरूच्या गुहेत, 2 मुलींना तिथेच जन्मही दिला, पण...

काय आहे प्रकरण?
यमनमधील व्यापार कायद्यानुसार, जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक नाही, त्याला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते. निमिषाने कायद्यांनुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या. निमिषाने 2015 मध्ये महदीसोबत तिचे क्लिनिक सुरू केले. पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. तिने महदीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता. महदीने तिचा पासपोर्टही काढून घेतला होता.

निमिषाला हवा होता पासपोर्ट
निमिषाने महदीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तिला 2016 मध्ये अटक करण्यात आली. परंतु काही अहवालानुसार, त्याला काही दिवसांनंतरच सोडण्यात आले. 2017 मध्ये हे वाद नवीन वळणावर पोहोचले. आपला पासपोर्ट परत मिळवून भारतात परत येण्यास उत्सुक असलेल्या निमिषाने एका स्थानिक तुरुंग रक्षकाची मदत घेतली, ज्याने महदीला अक्षम करण्यासाठी शामक औषधांचा (sedatives) वापर करण्याचा सल्ला दिला. त्या रक्षकाचा सल्ला मानून, निमिषाने तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यातून मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला शामक औषधांचे इंजेक्शन दिले. जास्त डोसमुळे त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे निमिषाला अटक करण्यात आली आणि या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com