Uddhav Thackeray : देशात अघोषित NRC लागू केला आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. बिहारमध्ये सध्या सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या घोळावरही त्यांनी भाष्य केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

Uddhav Thackeray : शिवसेना UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत घेत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. बिहारमध्ये सध्या सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या घोळावरही त्यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ झाला आहे. त्याबाबतचा निर्णय आला की नाही याची कल्पना नाही. मात्र स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची. म्हणजेच याचा अर्थ असा की, देशात अघोषित एनआरसी (National Register of Citizens) लागू झाला का? देशात जेव्हा सीएए आणि एनआरसी विषय गाजला होता. दिल्लीत त्याच्यावरून रान पेटलं होतं. साधारण त्यावेळी विषय हाच होता, तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. त्यामुळे देशाता आता एनआरसी लागू झाला आहे का? याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

शिंदे गट आणि भाजपवर टीका

एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट 'गद्दार' म्हटले. "बाळासाहेबांना ज्यांनी विरोध केला, त्याच मार्गावर शिंदे गट गेला आहे. त्यांच्या मताला काहीच किंमत नाही. शिंदे त्यांच्या 'मालकांना' भेटायला दिल्लीत आल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे. यावर पंतप्रधान नरेद्र मोदी गप्प आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यांनी मोदी सरकारला 'निष्क्रिय, अपयशी आणि असहाय्य' असे संबोधले. परराष्ट्र धोरणाबद्दल सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान आणि इतर मंत्री देशासाठी नव्हे, तर भाजपसाठी 'प्रचार मंत्री' म्हणून काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Advertisement

Topics mentioned in this article