जाहिरात

Kerala Name Change : आता केरळ म्हणायचं नाही! राज्याचं नाव बदलणार; नवं नाव काय असेल?

केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

Kerala Name Change : आता केरळ म्हणायचं नाही! राज्याचं नाव बदलणार; नवं नाव काय असेल?

Kerala Name Change : दक्षिणेतील पर्यटनासाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे केरळ. निसर्ग संपन्न, दाक्षिणात्य खाण्याची रेलचेल असलेलं केरळ अनेकांच्या पसंतीचं राज्य आहे. मात्र यापुढे केरळला केरळ म्हणता येणार नाही. कारण केरळच्या नावात बदल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

केरळचं नाव बदलून काय होणार? 

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज २४ फेब्रुवारी रोजी ‘केरळ' या राज्याच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केरळचं नाव ‘केरलम ' असं करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम ) बिल , 2026' हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेचे मत जाणून घेण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवतील. राज्य विधानसभेकडून मत प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार पुढील कार्यवाही करेल आणि राष्ट्रपतींची शिफारस घेऊन ‘केरळ' या राज्याचे नाव ‘केरलम' असे बदलण्यासाठी ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम) बिल , 2026' हे विधेयक संसदेत सादर केलं जाईल.

नक्की वाचा - VIDEO: थरारक! उत्तराखंडमध्ये मज्जा-मस्ती करायला जाण्याचा प्लान करताय? आधी हा व्हिडीओ पाहा

केरळ राज्याचं नाव का बदललं? 

केरळ अधिवेशनाने 24 जून 2024 रोजी ‘केरळ' या राज्याचे नाव ‘केरलम' करण्याचा ठराव मंजूर केला होता. मल्यालम भाषेत ‘केरलम' असं म्हटलं जातं. 
1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. ‘केरळ पीरवी डे' देखील 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपासूनच मल्याळम भाषिकांसाठी ‘युनाइटेड केरळ' राज्याची मागणी होती. मात्र भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्याचे नाव ‘केरळ ' असं नोंदवलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य विधानसभेने केंद्र सरकारला संविधानाच्या कलम 3 अंतर्गत तातडीने पावले उचलून राज्याचे नाव ‘केरलम ' असे करण्याची एकमताने विनंती केली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com