Unnao rape case: उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य दोषी कुलदीप सिंह सेंगर याची मुलगी इशिता सेंगर हिने सोमवारी 'X' (ट्विटर) वर एक दीर्घ पोस्ट शेअर केली आहे. गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत आपले कुटुंब "थकले आहे, घाबरलेले आहे आणि आता विश्वास गमावत आहे," असे तिने या पत्रात म्हटले आहे.
आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. तसेच दोषीला 2 आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे.
इशिता सेंगरच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
इशिताने पत्रात लिहिलं की, गेली 8 वर्षे तिचे कुटुंब शांतपणे न्यायाची प्रतीक्षा करत आहे, या विश्वासाने की जर आपण कायदेशीर मार्गाने गेलो, तर सत्य नक्कीच समोर येईल. मात्र, आज तो विश्वास डळमळीत होत आहे.
आज माझी ओळख केवळ "भाजप आमदाराची मुलगी" या एका लेबलपुरती मर्यादित केली गेली आहे. या लेबलमुळे तिचे माणूसपण, तिचे अधिकार आणि तिची प्रतिष्ठा लोकांच्या लेखी संपली आहे. ज्या लोकांनी तिला कधी पाहिले नाही किंवा प्रकरणाची कागदपत्रे वाचली नाहीत, त्यांनी केवळ पूर्वग्रहातून माझ्या आयुष्याचे मूल्य ठरवून टाकले आहे, असं इशिताने पत्रात म्हटलंय.
(नक्की वाचा- वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?)
शांततेची मोठी किंमत चुकवावी लागली
लोक आम्हाला "शक्तिशाली" म्हणतात, असा उल्लेख करत तिने एक टोकदार प्रश्न विचारला. ती विचारते, "अशी कोणती शक्ती आहे जी एका कुटुंबाला 8 वर्षे निशब्द करून ठेवते? अशी कोणती शक्ती आहे, जिथे तुमचे नाव रोज चिखलात ओढले जाते आणि तुम्ही फक्त व्यवस्थेवर विश्वास ठेवून शांत बसता? आम्ही आंदोलने केली नाहीत, टीव्हीवर ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा हॅशटॅग चालवले नाहीत. आम्हाला वाटले की सत्याला कोणत्याही दिखाव्याची गरज नसते. पण या शांततेची आम्हाला मोठी किंमत चुकवावी लागली.
(नक्की वाचा- वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?)
बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या
गेल्या 8 वर्षांपासून दररोज आमचा अपमान आणि मानहानी केली जात आहे. आर्थिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या कुटुंब पूर्णपणे खचले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर मला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या आहेत.
मी हे पत्र कोणाला धमकावण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी लिहित नाहीये. मी घाबरलेली आहे आणि मला आजही वाटते की कोणीतरी माझे ऐकून घेईल. आम्हाला कोणाची मेहेरबानी नकोय किंवा आम्ही 'कोण' आहोत म्हणून संरक्षण नकोय. आम्हाला फक्त न्याय हवाय कारण आम्ही माणसे आहोत."
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्ली उच्च न्यायालयाने कुलदीप सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, सेंगर याची कोठडीतून सुटका होणार नाही. लोकप्रतिनिधींना 'लोकसेवक' या व्याख्येतून वगळण्याच्या उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.