जाहिरात

Mahakumbh 2025: देशवासियांना आवाहन ते सनातन धर्माचा विचार; योगी आदित्यनाथ काय म्हणाले? 10 मोठे मुद्दे

 NDTV नेटवर्कचे संपादक संजय पुगलिया यांच्यासोबत संवाद साधताना प्रयागराजमधील महाकुंभचे नियोजन, सनातन धर्म, विरोधकांची टीका याबाबत बोलतानाच उत्तर प्रदेशचे नवे रुप पाहण्यासाठी प्रयागराजला भेट देण्याचे आवाहनही केले.

Mahakumbh 2025: देशवासियांना आवाहन ते सनातन धर्माचा विचार; योगी आदित्यनाथ काय म्हणाले? 10 मोठे मुद्दे

Mahakumbh 2025:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एनडीटीव्हीच्या 'महाकुंभ संवाद' या विशेष कार्यक्रमामध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्याबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.  NDTV नेटवर्कचे संपादक संजय पुगलिया यांच्यासोबत संवाद साधताना प्रयागराजमधील महाकुंभचे नियोजन, सनातन धर्म, विरोधकांची टीका याबाबत बोलतानाच उत्तर प्रदेशचे नवे रुप पाहण्यासाठी प्रयागराजला भेट देण्याचे आवाहनही केले. वाचा त्यांच्या मुलाखतीमधील दहा मोठे मुद्दे: 

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? वाचा 10 मोठे मुद्दे..

  1. 1. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे, सनातन धर्म हा सर्व मानवांचा धर्म आहे. उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पंथ वेगळे असू शकतात, जाती वेगळ्या असू शकतात, पण धर्म एक आहे आणि तो धर्म म्हणजे सनातन धर्म. कुंभ हा त्या सनातन धर्माचा एक महान उत्सव आहे.
  2. 2. आजच्या पिढीला भारताच्या या महान घटनेबद्दल काय वाटते... जगाला काय वाटते?याबाबत जाणून घेतल्यानंतर आम्ही थक्क झालो. काहींनी म्हटले की कुंभ जातीभेदाला प्रोत्साहन देतो, काहींनी म्हटले की येथे लिंगभेद होतो.. काहींनी म्हटले की येथे सर्व प्रकारच्या सामाजिक वाईट गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. 
  3. 3. महाकुंभ ही एक संधी आहे, जो कोणी प्रयागराजला जाईल तो पुण्याचा भागीदार होईल. जरी तो जात नसला तरी किमान तो सकारात्मक विचार करत आहे. मला वाटतं की प्रयागराज सर्वांचे आहे, प्रत्येकाने इथे येऊन स्नान करावे.
  4. 4. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत 45 दिवसांत होणारा या शतकातील महाकुंभ येणाऱ्या पिढ्यांसाठी अविस्मरणीय राहील. पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात दिलेले दृष्टिकोन पूर्ण वचनबद्धतेने अंमलात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मला आनंद आहे की आतापर्यंत 12 कोटींहून अधिक भाविक पूज्य संतांच्या उपस्थितीत माँ गंगा, माँ यमुना आणि माँ सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणीत स्नान करून पुण्य लाभले आहे.
  5. 5. लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीने अपप्रचार केलाय त्यांच्यासाठी विदेशी फंडिगही झाली होती. त्यांनी संविधान बदलण्याचा, आरक्षण संपवण्याचा खोटा प्रचार केला. सोशल मीडिया आणि डिजीटल  मिडीयांचा चुकीचा वापर केला. मात्र आता त्यांचे सत्य समोर आले आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र च्या निकालांनी त्यांची जागा दाखवली आहे.
  6. 6. आम्ही राज्यामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी जे आवश्यक आहे त्याप्रमाणे योजना राबवल्या. उत्तर प्रदेशच्य जनतेला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात जेवढ्या सुविधा मिळाल्या नाहीत तेवढ्या फक्त या या सात वर्षात दिल्यात. गेल्या पावणे आठ वर्षात सात लाख युवकांना रोजगार दिला आहे. महिलांमध्ये सुरक्षेची भावना आहे. लोकांपुढे रोजगाराच्या, स्वावलंबी होण्याच्या संधी आहेत.
  7. 7. जेव्हा जेव्हा आपण सनातन धर्माची तुलना कोणत्याही पंथाशी किंवा धर्माशी करतो तेव्हा आपण सनातन धर्माचे अवमूल्यन करतो. सनातन धर्मात शेकडो पंथ आणि संप्रदाय आहेत. त्या सर्वांची उपासना करण्याची स्वतःची पद्धत आहे. यापैकी तुम्ही कोणावर नियंत्रण ठेवणार, हे सर्वात मोठे अज्ञान आहे.
  8. 8. चुकूनही धार्मिक श्रद्धेत हस्तक्षेप करण्याची संधी सरकारला देऊ नये. श्रद्धेचे मुद्दे धर्मगुरुंनी ठरवावेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप अजिबात होऊ देऊ नये. जर धार्मिक बाबींमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला तर अराजकता माजेल. 
  9. 9. काही लोक आजही आहेत जे एकमेका भेदभाव करतात. त्यांची वृत्ती फोडा आणि राज्य करा अशी आहे. ते नेहमीच देश आणि उत्तरप्रदेशावर टीका करत असतात. त्यांचे विचार नकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी ध्रुतराष्ट्र बनू नये. 
  10. 10. आज उत्तरप्रदेश रोजगाराचे पर्यटनाचे सर्वात मोठे डेस्टिनेशन बनले आहे.  प्रत्येकाच्या मनात इथे सुरक्षेची भावना आहे. युपी पोलीस आणि सरकार संपूर्ण ताकदीने यासाठी काम करत आहे. आता उत्तरप्रदेश रोगांचे नाही भारताचे ग्रोथइंजिन आहे. सर्वांनी प्रयागराजला या आणि नव्या उत्तरप्रदेशचे दर्शन नक्की घ्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: