
उत्तर प्रदेशात सध्या काही आश्चर्यकारक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सासू-जावयाची प्रेम कहाणी उघडकीस आली होती. आता भावजय आणि दिर पळून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जी महिला आपल्या दिरासोबत फरार झाली आहे, तिने या निर्णयामागचं जे कारण सांगितलं आहे, तेही खूपच रोचक आणि धक्कादायक आहे. तिने आपल्या पतीला सोडून दिरासोबत पळून जाण्याचं कारण पतीची दाढी असल्याचं सांगितलं आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मेरठमधील आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी महिला आणि तिच्या दिराला शोधून काढलं आहे. मात्र, महिलेने तिच्या पतीवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या पतीचे नाव सागिर असे आहे. या प्रकरणी सागिरने ही काही गोष्टी सांगितल्या आहेत. सागिरने सांगितलं की त्याने निकाहच्या वेळी आपली दाढी व्यवस्थित करून आपल्या नववधू सोबत फोटोसेशन केलं होतं. पण बिचाऱ्या सागिरला काय माहित होतं की, त्याच्या चेहऱ्याची शान असलेली हीच दाढी निकाहच्या काही महिन्यांतच त्याचे घर उद्ध्वस्त करणार आहे.
मेरठच्या उज्ज्वल गार्डन कॉलनीत राहणाऱ्या सागिरचा निकाह 7 महिन्यांपूर्वी याच जिल्ह्यातील इंचोली येथील अर्शीसोबत झाला होता. निकाहानंतर अर्शीने आपल्या पती सागिरच्या दाढीवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती. तिला पतीची दाढी आवडत नव्हती. ती कापून टाका असं ती वारंवार सांगत होती. सागिरने आर्शीचं म्हणणं ऐकलं नाही आणि दाढी कापली नाही. दिवसेंदिवस दाढीवरून पती-पत्नीमध्ये वाद वाढत गेला. याच कालावधीत अर्शीला तिचा क्लीन शेव्ह केलेला दीर साबिर आवडायला लागला. दिरानेही वहीनीला मग प्रतिसाद दिला. दीर साबिर आणि भावजय अर्शीची जवळीक इतकी वाढली की लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांतच अर्शी आपल्या दिरासोबत पळून गेली.
या घटनेमुळे सागिरला स्वतःची खूप फसवणूक झाल्यासारखं वाटलं. अनेक दिवस त्याला काय सांगावं हेच कळेना. सासरच्या लोकांच्या वागणुकीवरून तर असं वाटत होतं की जणू त्यांना अर्शीच्या दिरासोबत पळून जाण्याचं काहीच आश्चर्य नाही, उलट समाधान आहे. 3 महिने जेव्हा सागिरला आपली पत्नी अर्शी आणि भाऊ साबिर यांचा काही पत्ता लागला नाही, तेव्हा त्याने लिसाडी गेट पोलीस ठाण्यात दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.
ट्रेंडिंग बातमी - Big News: महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? थांबा! त्या आधी ही बातमी नक्की वाचा
बुधवारी अर्शीच्या माहेरी पोलिसांचा फोन गेल्यावर, अर्शी आपल्या दिराला घेऊन तिच्या म्हणजेच सागिरच्या घरी पोहोचली. अर्शीने आपल्या पती सागिरला स्पष्टपणे सांगितलं की तिला आता त्याच्यासोबत राहायचं नाही, तर तिला तिचा दीर साबिरसोबत निकाह करून राहायचं आहे. यावरून वाद वाढला आणि मोहल्ला जमा झाला. त्यानंतर गोंधळ वाढल्याने तिथे पोलीसही पोहोचले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world