जाहिरात

UP News: बायकोने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत

मोना आणि शुभम दिवाकर यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले आहेत. शुभम एका खासगी कंपनीत काम करत होता, तर मोना कुटुंबाला आधार देण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात 'वेलकम गर्ल' म्हणून काम करत होती.

UP News: बायकोने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत
The neighbours of the couple claimed the man used to thrash her wife often after consuming alcohol.

नवऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर बायकोने व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील रामालय मोहल्ला भागात ही घटना घडली.  मोना महिलाने हे टोकाचं उचलल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

मोनाचा पती शुभम दिवाकर याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी तो कामावरून परतल्यावर त्याने पत्नी मोनाकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले. मोनाने पैसे देण्यास नकार दिल्यावर संतापलेल्या शुभमने तिला क्रूरपणे मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो तिच्याकडून पैसे घेऊन दारू पिण्यासाठी घराबाहेर गेला.

व्हिडिओ कॉलवर आत्महत्या 

पती शुभम घराबाहेर पडल्यानंतर अवघ्या 16 मिनिटांनी रडणाऱ्या मोनाने त्याला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि शुभमसमोरच तिने गळफास घेतला. मोनाला वाचवण्यासाठी शुभमने घरी धाव घेतली, परंतु घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांनी  पोलिसांना  माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत मोनाचा मृत्यू झाला होता. 

(नक्की वाचा-  Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत

मोना आणि शुभम दिवाकर यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले आहेत. शुभम एका खासगी कंपनीत काम करत होता, तर मोना कुटुंबाला आधार देण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात 'वेलकम गर्ल' म्हणून काम करत होती.

मोनाच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणी पोस्ट मॉर्टम हाऊसबाहेर जमा झाल्या. त्यांनी संतप्त होऊन दिवाकरला घेरले आणि त्याला मारहाण केली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. मोनाच्या मैत्रिणींनी शुभमवर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मोनाचा मोबाईलमधील कॉल हिस्ट्री डिलीट केल्याचा गंभीर आरोप देखील केला.

पोलिसांची भूमिका

रावतपूर पोलिसांनी सांगितले की, मोनाच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास, योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, शेजाऱ्यांनी दावा केला आहे की शुभम दारू पिऊन मोनाला वारंवार त्रास देत होता.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com