UPSC 2025 Final Result Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदाही महाराष्ट्रातील तरुणांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या परीक्षेत देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. निकालात पहिल्या 100 यशस्वी उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 गुणवंतांनी स्थान मिळवले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या या निकालामुळे राज्यातील यशस्वी उमेदवारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अनुज अग्निहोत्री देशात पहिला
यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जोधपूरच्या अनुज अग्निहोत्री याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. अनुजने MBBS चे शिक्षण पूर्ण केले असून त्याने 2023 पासून या परीक्षेची तयारी सुरू केली होती. अल्पावधीतच त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर देशात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे.
देशातील पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या हृषिकेश आलासे याने 61 वा क्रमांक मिळवून राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यापाठोपाठ आकाश त्रिवेदी (73), गौरव चोप्रा (83), सायली पगार (87) आणि दीक्षा पाटकर (88) या उमेदवारांनी पहिल्या शंभरात स्थान मिळवले आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Budget 2026: पुणे मेट्रो आता सासवड, वाघोलीच्या दारात; बजेटमध्ये पुण्याच्या पायाभूत सुविधांचा धमाका )
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा कायम
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील उमेदवारांनी या निकालात बाजी मारली आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने अभ्यास करणाऱ्या या तरुणांनी राज्याचा गौरव वाढवला आहे. यामध्ये अनेक मुलींनीही घवघवीत यश संपादन केले असून शेवटच्या क्रमांकापर्यंत महाराष्ट्राचे उमेदवार यादीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
यशस्वी उमेदवारांची यादी
हृषीकेश आलासे - 61
आकाश त्रिवेदी - 73
गौरव चोप्रा - 83
सायली पगार - 87
दीक्षा पाटकर - 88
ऋतुजा गायकवाड - 106
वरुण टोकस - 117
अंकिता अनिल पाटील - 140
आर्यन सिरसीकर - 175
कार्तिक बच्छाव - 177
राहुल पाटील - 224
शुभम शरद बेहेरे - 226
ऋषिकेश पालिमकर - 283
मोहिनी जगताप - 323
अभिषेक ओझार्डे - 336
हर्षवर्धन पाटील - 349
हर्षवर्धन तिडके - 355
कुणाल अहिरराव - 430
अभिषेक मगदूम - 449
धनश्री अहिरे - 489
मनोज पाटील - 493
विशाखा कदम - 504
नंदिनी पाटील - 512
रजत वाळके - 514
निखिल तांबे - 517
श्रुती चव्हाण - 527
धनंजय दिघे - 529
संकेत कुंभार - 539
साईराज पाटील - 545
आरुषा पाटील - 553
पारस मिस्त्री - 555
बापूसाहेब गायकवाड - 561
प्रवीण कोळपे - 584
अविष्कार डेर्ले - 591
रोहित माळवेकर - 601
अभिषेक टेकाडे - 610
सिद्धार्थ तागड - 619
भाग्यश्री नायकेले - 647
शिवम वखारे - 651
पांडुरंग कांबळी - 660
अश्विनी कोळेकर - 675
प्रज्वल नासरे - 677
अल्पेश ढवळे - 687
सूरज सूर्यवंशी - 702
रामेश्वर शिंदे - 705
बसवराज पाटील - 739
प्रीतकुमार भाले - 742
राजश्री देशमुख - 754
चेतन ठाकरे - 762
प्रांजली मेश्राम - 767
मनीष झेंडे - 788
प्रथमेश शिंदे - 817
राहुल चांडोलकर - 831
हेमकृष्ण पिसाडे - 849
अतुल राजुरकर - 863
रोहित सांगळे - 865
सुरेश बोरकर - 912
प्रेरणा खवले - 913
अनिकेत अहिरे - 941
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world