- शामली जिल्ह्यातील कांधला येथील आस्था जैन यांनी UPSC परीक्षेत देशात 9 वी रँक मिळवून इतिहास घडवला आहे
- आस्थाने पहिल्या प्रयत्नात 131 वी रँक आणि दुसऱ्या प्रयत्नात 186 वी रँक मिळवली होती, पण हार मानली नाही
- तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली असून सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन केले आहे
UPSC 9th Rank Aastha Jain Story: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कांधला येथील आस्था जैन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात 9 वी रँक मिळवून इतिहास रचला आहे. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर शामलीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, तिचे वडील अजय जैन हे एका छोट्या किराणा दुकानावर आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु आज त्यांच्या लेकीने संपूर्ण जिल्ह्याचे नाव देशात गाजवले आहे. लेकीने मिळवलेल्या या यशाने तिचे वडील प्रचंड खूश झाले आहेत. शिवाय आस्थाच्या मेहनतीला ही फळ मिळालं आहे.
आस्थाचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या प्रयत्नात तिने 131 वी रँक मिळवली होती. ज्यानंतर तिची निवड IPS म्हणून झाली. सध्या ती हैदराबादमध्ये आयपीएसची ट्रेनिंग घेत आहे. मात्र, तिचे स्वप्न आयएएस (IAS) होण्याचे होते. दुसऱ्या प्रयत्नात तिला 186 वी रँक मिळाली. पण तिने हार मानली नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तिने आपली जिद्द पूर्ण करत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले. तिने आपले स्वप्न पूर्ण केले. ती आयएएस होण्यात यशस्वी झाली आहे.
आस्थाचे शालेय शिक्षण शामलीमध्येच झाले. तिने 2019 मध्ये 12 वीच्या परीक्षेत 500 पैकी 496 गुण मिळवून देशात चौथा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. तिने कोणत्याही मोठ्या क्लासवर अवलंबून न राहता 'सेल्फ स्टडी' आणि ऑनलाइन शिक्षणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आस्थाच्या यशात तिच्या आई-वडिलांचा आणि भावंडांचा मोठा वाटा आहे. तिचे वडील अजय जैन यांनी किराणा दुकानाच्या कमाईतून आपल्या तिन्ही मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण दिले. आस्थाने आपल्या यशाचे श्रेय आई ममता जैन, वडील अजय आणि आपल्या शिक्षकांना दिले आहे.
कठोर परिश्रम आणि सातत्य असल्यास यश नक्कीच मिळते, हे आस्था जैनने सिद्ध केले आहे. शामली जिल्ह्यातील एका सामान्य व्यापाऱ्याच्या मुलीने यूपीएससीमध्ये देशात 9 वा क्रमांक मिळवत सर्वां समोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आस्थाने 12 वीतही देशात नाव कमावले होते. दिल्लीतून पदवी घेतल्यावर तिने घराची परिस्थिती आणि वडिलांचे कष्ट पाहून प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. आज तिची ही भरारी केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
कान में पेंसिल लगाए खड़े परचून व्यापारी अजय जैन की बेटी आस्था जैन IAS ऑफिसर बनी है। UPSC में 9वीं रैंक आई है।
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 6, 2026
📍शामली, उत्तर प्रदेश@hindipatrakar pic.twitter.com/0BrvdZeDyz
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world