UPSC Result 2026 : दोघींनी पेढे वाटले, दोघींचे सत्कार झाले; पण खरी अधिकारी एकच! निकालातील धक्कादायक सत्य उघड

UPSC Result 2026 : युपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आनंदाच्या वातावरणात अचानक एका मोठ्या गोंधळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
UPSC Result 2026 : या प्रकरणाची गंभीर दखल घेत युपीएससीने सखोल चौकशी केली.
मुंबई:

UPSC Result 2026 : युपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आनंदाच्या वातावरणात अचानक एका मोठ्या गोंधळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एकाच नावाच्या दोन तरुणींनी यशाचा दावा केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणातील सर्व संभ्रम दूर झाला असून केंद्रीय लोक सेवा आयोगाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. या निकालात नक्की कोण बाजी मारली आणि कुणाचा दावा खोटा ठरला, याचे धक्कादायक वास्तव आता उघड झाले आहे.

एकाच नावाचा मोठा पेच

6 मार्च 2026 रोजी युपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर आकांक्षा सिंह नावाच्या दोन महिला उमेदवारांनी 301 वी रँक मिळाल्याचा दावा केला. यामध्ये एक उमेदवार बिहारची होती, तर दुसरी उत्तर प्रदेशातील गाझीपूरची होती. 

दोघींचे नाव सारखे, रँक सारखी आणि विशेष म्हणजे रोल नंबरही एकच असल्याचे सांगण्यात आल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. या विचित्र योगायोगामुळे सोशल मीडियावरही उलटसुलट चर्चांना उधाण आले होते आणि युपीएससीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )

आयोगाकडून कागदपत्रांची पडताळणी

या प्रकरणाची गंभीर दखल घेत युपीएससीने सखोल चौकशी सुरू केली आणि दोन्ही उमेदवारांच्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. या तपासणीत बिहारच्या आकांक्षा सिंह हिने सादर केलेले प्रवेश पत्र संशयास्पद आढळले. 

Advertisement

तिच्या अ‍ॅडमिट कार्डवर रोल नंबर 0856794 असा होता, पण त्यावरील बारकोडमध्ये 0856569 हा वेगळाच क्रमांक दिसून आला. या विसंगतीमुळे बिहारच्या उमेदवाराचा दावा कमकुवत ठरला आणि बनावटगिरीचे संशय गडद झाले.

( नक्की वाचा : UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी )
 

खरी अधिकारी अखेर उघड

आयोगाने आता स्पष्ट केले आहे की, उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील रहिवासी असलेली आकांक्षा सिंह हीच या परीक्षेतील खरी यशस्वी उमेदवार आहे. 301 वी रँक मिळवणाऱ्या या आकांक्षा सिंहचा रोल नंबर 0856794 हा असून, ही माहिती आयोगाच्या अधिकृत डेटाशी तंतोतंत जुळली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाने पडताळणी केलेली सर्व कागदपत्रे आता जाहीर केली आहेत.

Advertisement

पालकांच्या नावामुळे सत्यावर शिक्कामोर्तब

या यशावर अधिकृत शिक्कामोर्तब करताना आयोगाने पालकांच्या नावाचा संदर्भही दिला आहे. यशस्वी ठरलेल्या उत्तर प्रदेशच्या आकांक्षा सिंहच्या वडिलांचे नाव रणजीत सिंह आणि आईचे नाव नीलम सिंह असे आहे. ही माहिती युपीएससीच्या रेकॉर्डमध्ये आधीच नोंदवलेली होती. याउलट बिहारच्या आकांक्षा सिंहने केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, रणवीर सेनेच्या माजी प्रमुखाची नात असलेल्या या तरुणीने ही परीक्षाच दिली नसल्याचे तपासात उघड झाले असून खोट्या सेलिब्रेशनचा बनाव आता उघडा पडला आहे.

Topics mentioned in this article