Success Story: करोडपती पतीकडून किती पोटगी हवीय? UPSC मध्ये प्रश्न, रूपलचं भन्नाट उत्तर अन् बनली थेट टॉपर

घटस्फोटानंतरच्या पोटगीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिने कायदा आणि भावना यांचा अचूक संगम साधला.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मध्य प्रदेशच्या खंडवा येथील रूपल जायसवालने UPSC 2025 परीक्षेत देशात 43 वी रँक प्राप्त केली आहे
  • रूपलने मुलाखतीत पोटगीच्या प्रश्नावर संतुलित उत्तर देत मेंटेनन्सचा अर्थ शिक्षा नव्हे तर जीवनमान टिकवणे सांगितले
  • तिच्या उत्तरामुळे मुलाखत घेणाऱ्या बोर्डावर सकारात्मक प्रभाव पडला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

UPSC Success Story Rupal Jaiswal: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) स‍िविल सेवा परीक्षा 2025 चा निकाल  6 मार्च 2026 रोजी जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथील रूपल जायसवाल हिने देशात 43 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. रूपलने यापूर्वीच्या प्रयत्नात 512 वी रँक मिळवली होती. परंतु तिचे लक्ष्य आयएएस (IAS) होण्याचे असल्याने तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. या प्रयत्नात मात्र ती यशस्वी ठरली. तिने थेट 43 व्या रँकला गवसणी घातली. या आधी तिच्या मुलाखतीत तिला विचारल्या गेल्या प्रश्नाला तिने दिलेले उत्तर हे तिच्या यशाचे गमक ठरले. त्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.  

रूपलच्या यशापेक्षा तिच्या मुलाखतीची (Interview) सध्या मोठी चर्चा होत आहे. मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आले की, "जर पती 20 कोटींचा मालक असेल आणि पत्नीने कोणत्याही ठोस कारणाशिवाय घटस्फोट घेतला, तर तिला किती मेंटेनन्स (पोटगी) मिळायला हवी?" यावर रूपलने अत्यंत परिपक्व उत्तर दिले. ती म्हणाली की, हे सर्व त्या महिला कामाला आहे की नाही आणि मुलांचा ताबा कोणाकडे आहे यावर अवलंबून असेल.

नक्की वाचा - UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी

जेव्हा बोर्डाने तिला एक निश्चित आकडा विचारला, तेव्हा तिने 10% असे सुचवले. बोर्डाने तिला प्रतिप्रश्न केला की "50% का नाही?", त्यावर रूपलने दिलेले उत्तर कौतुकास्पद होते. ती म्हणाली, "मेंटेनन्सचा अर्थ पतीला शिक्षा देणे असा नसून, पत्नीच्या मूलभूत गरजा आणि जीवनमान टिकवून ठेवणे हा आहे." तिच्या या संतुलित दृष्टिकोनामुळे बोर्ड खूप प्रभावित झाले. तिच्या या उत्तराने सर्वच जण प्रभावीत झाले. घटस्फोटाच्या प्रकरणात एकतर्फी निर्णय नसावेत असचं जणू तिने यातून सुचित केले. दोघांना ही समान न्याय मिळाला पाहीजे असं तिचं म्हणणं होतं. अलिकडच्या काळात पतीला पोटगीच्या माध्यमातून लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत.  

नक्की वाचा - Maha Budget 2026: सरकारची कर्जमाफीची घोषणा! 'या' शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार, काय आहेत नियम अन् अटी?

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या रूपलने प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहिले होते. ती दररोज 8 तास अभ्यास करायची. महिला सक्षमीकरणाबद्दल तिचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. तिच्या मते, जोपर्यंत पुरुषांना महिलांचा सन्मान करायला शिकवले जात नाही, तोपर्यंत महिला सुरक्षा अपूर्ण आहे. शालेय पुस्तकांतून स्त्रियांना केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित दाखवणारा मजकूर हटवला पाहिजे, असेही ती ठामपणे मांडते. तिची आयएएस होण्याची जिद्द होती. ती जिद्द तिने जोपासली. शेवटी तिने तिचे स्वप्न पुर्ण केले. 

Advertisement

नक्की वाचा - Maha Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? पैसे वाढले का?

UPSC 2025 च्या निकालात खंडवाच्या रूपल जायसवालने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. मुलाखतीत विचारलेल्या एका पोटगीच्या प्रश्नावर रूपलने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. घटस्फोटानंतरच्या पोटगीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिने कायदा आणि भावना यांचा अचूक संगम साधला. 'पोटगी ही शिक्षा नसून उदरनिर्वाहाचे साधन आहे', हे तिने बोर्डाला पटवून दिले. वकिलीची पार्श्वभूमी असलेल्या रूपलने दुसऱ्या प्रयत्नात 512 वी रँक मिळाल्यावरही हार न मानता 43 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.रूपलच्या यशात तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. अभ्यासासाठी तिचा भाऊ कागदपत्रे आणि नोट्स आणून द्यायचा, तर आईने तिला घरकामातून सवलत दिली होती.