Uttarakhand Uniform Civil Code Explainer : देवभूमी उत्तराखंडमध्ये आजपासून (27 जानेवारी 2025) मोठा बदल झाला आहे. आजपासून राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू झाला आहे. UCC म्हणजेच समान नागरी कायदा लागू करणारा उत्तराखंड देशातील पहिलं राज्य आहे. आसामसह देशातील अनेक राज्यांनी उत्तराखंड UCC अधिनियम एक मॉडल म्हणून स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशातील अन्य राज्यातही हा कायदा लागू होऊ शकतो असं, मानलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2022 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. यूसीसी लागू झाल्यानं उत्तराखंडमध्ये काय बदल होणार आहे जाणून घेऊया
उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू झाल्यानंतर काय बदल होणार?
- लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल. त्यासाठी ग्रामसभेच्या स्तरावर देखील ही सूविधा देण्यात येणार आहे. लग्नाचं रजिस्ट्रेशन 6 महिन्यांच्या आत करावे लागेल.
- उत्तराखंडमध्ये आता लिव्ह इन रिलेशनशीपमधील जोडप्यांनाही रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- लिव्ह इन रिलेशनशिपमधून एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला लग्नानंतर होणाऱ्या मुलांसारखेच सर्व कायदेशीर अधिकार असतील.
- विवाहयोग्य मुलींचं वय एक समान असेल.
- सर्वांना मुलं दत्तक घेण्याचा अधिकार असेल.
- अन्य धर्मातील मुलांना दत्तक घेता येणार नाही.
- मुलींना मुलांच्या बरोबरीनं वारसा हक्क मिळेल.
- अनुसूचित जनजातींचा या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
- पूजा आणि परंपरेच्या प्रथांमध्ये कोणताही बदल नाही.
- बहूपत्नीत्व आणि हलाला प्रथेवर बंदी
- घटस्फोटासाठी सर्व जाती आणि धर्मासाठी एकच नियम
उत्तराखंड सरकारनं समान नागरी कायद्यासाठी एक पोर्टल तयार केलं आहे. त्या माध्यमातून लग्न, लिव्ह-इन रिलेशनशिप, वारसा हक्कसह UCC मध्ये समावेश असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी अर्ज करता येईल.
( नक्की वाचा : झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहण यामध्ये काय आहे फरक? कधी विचार केलाय? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world