जाहिरात

Veg Biryani Controversy: व्हेज बिर्याणीवरून नवा वाद! मोठा समूह रस्त्यावर, कबाब-चापही टार्गेट, नेमके कारण काय?

Veg Biryani Controversy: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये 'व्हेज बिर्याणी' नावावरून एका मोठ्या समूहाकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नेमकी काय आहे मागणी, वाचा सविस्तर वृत्त...

Veg Biryani Controversy: व्हेज बिर्याणीवरून नवा वाद! मोठा समूह रस्त्यावर, कबाब-चापही टार्गेट, नेमके कारण काय?
"Veg Biryani Controversy: व्हेज बिर्याणीचा नवा वाद"
प्रतिकात्मक फोटो Canva
  • हरिद्वारमध्ये अखंड परशुराम आखाड्याच्या संतांनी व्हेज बिर्याणी नावावर बंदीसाठी आंदोलन सुरू केले
  • संतांचा दावा आहे की बिर्याणी हा मांसाहारी शब्द असून तो शाकाहारी लोकांच्या धार्मिक भावना दुखावतो
  • आंदोलनकर्त्यांनी व्हेज बिर्याणी नावाऐवजी व्हेज पुलाव हा शब्द वापरण्याची दुकानदारांना विनंती केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Veg Biryani Controversy: हरिद्वारमध्ये 'व्हेज बिर्याणी' या नावावरून नवा वाद पेटला आहे. अखंड परशुराम आखाड्याच्या संतांनी या नावावर बंदी आणण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. बिर्याणी हा मुळात मांसाहारी शब्द असल्याने भाविकांच्या भावना दुखावतात, असा दावा करत दुकानदारांना 'व्हेज पुलाव' नाव वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

'बिर्याणी' शब्दामुळे भावना दुखावतात; 'व्हेज पुलाव' नाव वापरण्याची मागणी| 'Biryani' Word Hurts Sentiments; Demand to Use 'Veg Pulav' Instead

अखंड परशुराम आखाडा' च्या नेतृत्वाखाली संतांच्या एका गटाने उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये 'व्हेज बिर्याणी' '(Veg Biryani)या नावाने अन्नपदार्थ विकण्यावर बंदी घालण्यासाठी एक आंदोलन सुरू केले आहे. हा समूह अशी मागणी करत आहे कि, दुकानदार आणि फेरीवाल्यांनी 'व्हेज बिर्याणी'(Veg Biryani) हा शब्द हटवून त्याऐवजी 'व्हेज पुलाव' (Veg Pulav) या शब्दाचा वापर करावा.

गाड्यांवर आणि पोस्टर्सवर लावले 'व्हेज पुलाव'चे स्टिकर्स| Volunteers Paste 'Veg Pulav' Stickers on Carts and Posters

आखाड्याचे स्वयंसेवक संपूर्ण शहरात पोस्टर्स आणि गाड्यांवर 'व्हेज बिर्याणी' (Veg Biryani)या शब्दावर 'व्हेज पुलाव'चे (Veg Pulav) स्टिकर्स चिकटवत आहेत. त्यांचा असा दावा आहे की, या शब्दावरून "मांसाहारी असल्याचा आभास" होतो, ज्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.

(नक्की वाचा : 2.78 मिलियन किमतीच्या केळ्यांसाठी 2 भारतीयांना नेपाळमध्ये अटक! गुन्हा ऐकून पायाखालची जमीन सरकेल, पोलीसही चक्रावले)

अखंड परशुराम आखाड्याचे अध्यक्ष पंडित अधीर कौशिक यांनी सांगितले की, स्थानिक महानगरपालिकेच्या नियमांनुसार हरिद्वारमधील काही क्षेत्रांमध्ये मांस, दारू आणि अंड्यांच्या विक्रीवर तसेच सेवनावर बंदी आहे.

'व्हेज बिर्याणी' नावावर बंदीसाठी संतांचे आंदोलन| Veg Biryani Controversy 

कौशिक म्हणाले, "बिर्याणी हा मुळात एक मांसाहारी पदार्थ आहे. जरी स्थानिक दुकानदार मांसाचा वापर करत नसले, तरीही हा शब्द शाकाहारी लोकांच्या भावना दुखवतो." ते पुढे असंही म्हणाले की, 'कबाब' आणि 'चाप' यासारखे पदार्थ देखील मांसाहारी पदार्थांशी जोडलेले आहेत तसेच त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा या नावांना लक्ष्य करेल. संस्थेने महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना हे शब्द आपल्या मेन्यूमधून (मेन्यू कार्ड) काढून टाकण्याची विनंती केली आहे.

कौशिक यांनी असाही दावा केला आहे की, घरपोच जेवण पोहोचवणारे ऑनलाइन ॲप्स (फूड डिलिव्हरी ॲप्स) प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मांसाहारी जेवणाचा पुरवठा करत आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांना अशा सेवांवर बंदी घालण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. जरी संपूर्ण शहरात मांसाहारावर पूर्ण बंदी नसली, तरी स्वातंत्र्यपूर्व काळातील नियमांनुसार कनखल आणि हर की पौडी यासारख्या मुख्य क्षेत्रांमध्ये मांसाहार विक्रीवर बंदी आहे.

(Content Source PTI)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com