उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 14,500 फूट उंचीवर असलेल्या सहस्त्रतालमध्ये ट्रॅकिंगचा एक ग्रुप बर्फाच्या वादळात अडकला होता. हे ट्रेकर्स कर्नाटक आणि महाराष्ट्रातील होते. मृतांमध्ये कर्नाटकातील एका दाम्पत्याचाही समावेश आहे. या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी होता, दुर्देवाने दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेत जीव सोडला. ही दुर्देवी कहाणी आहे सुजाता आणि विनायक मुंगरवाडी या दाम्पत्याची. या दाम्पत्याने सहस्त्रतालमधील बर्फाच्या वादळात आपला जीव गमावला.
ती परिस्थिती अत्यंत भयंकर असेल. कडक थंडीत ते दोघे एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतील. ज्या ठिकाणी ते अडकले होते, तेथे लांबलांबपर्यंत बर्फाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. विनय आणि सुजाताने जेव्हा सप्तपदी घेतल्या असतील तो दिवस त्यांना नक्की आठवला असेल. यावेळी त्यांनी एकत्र मृत्यूला सामोरं जावू अशी शपथ घेतली होती. मात्र प्रत्यक्षात असं काही समोर येईल याचा त्यांची विचारही केला नसेल. आयुष्याच्या शेवटच्या क्षणातही दोघे एकत्र होते.
एकत्र वाढदिवस आणि एकत्रच मृत्यू...
या दाम्पत्याचा वाढदिवस एकाच दिवस होता. मृत्यूच्या दिवशीही ते एकत्रच होते. त्यांच्या एक मित्राने सांगितलं, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. जर सुजाता आणि विनायकला एकमेकांचा वाचवण्याची संधी असती तर त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली असती.
या दोघांची भेट कॉलेजच्या दिवसात झाली होती. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी 3 ऑक्टोबरला येत होता. 51 वर्षांची सुजाता एका एनजीओमध्ये ट्रस्टी होती, तर 54 वर्षांचा विनायक पेशाने मॅकेनिकल इंजिनियर आणि कॉमवर्ग ग्लोबलमध्ये सहसंस्थापक होता. त्यांच्या पश्चात आई आणि दोन मुलं आहेत. त्यांची 28 वर्षांची मुलगी आदिती स्टार्टअपसाठी काम करते. तर 21 वर्षीय इशान इंजिनियरिंगचं शिक्षण घेतो.
Working tirelessly since yesterday, #IAF Cheetah and Mi 17 IV helicopters successfully retrieved the mortal remains of remaining four trekkers today.
— Indian Air Force (@IAF_MCC) June 6, 2024
The survivors of the mishap have also been airlifted to the nearest medical centre for further care and recuperation. The rescue… pic.twitter.com/7djMp2L097
या दोघांनी पूरग्रस्तांसाठीही मदत केली आहे. कोरोना काळात त्यांनी गरजूंना मास्क, फेस शील्ड आणि औषधं पुरवली होती. सुजाताला या मदतीतून समाधान मिळत होतं. या दोघांना पर्यावरण संबंधातील विषयात आवड होती.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी स्थित सहस्त्रताल ट्रेकमध्ये नऊ ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. ही कहाणी अत्यंत त्रासदायक आहे. ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील तेरा जण मृत्यूच्या तोंडातून सुखरूप बाहेर आलेत. त्यांनी आपला अनुभव कथन केला आहे. आपल्याच सहकाऱ्यांच्या मृतदेहांसोबत रात्र घालवणं वेदनादायी होतं, असं ते सांगतात. हवामान व्यवस्थित असतं तर पुढील चोवीस तासात आम्ही सुरक्षितपणे खाली उतरले असतो. मात्र अचानक हवामान बिघडलं आणि सर्व उद्ध्वस्त झालं. आमच्या डोळ्यांसमोर तेरा साथीदाऱ्यांनी जीव सोडला. या मृतदेहांसोबत आम्ही रात्र घालवली, असंही ते सांगतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेकिंगला आलेल्या नऊ जणांचा हायपोथर्मियामुळे मृ्त्यू झाला. हायपोथर्मिया अशी परिस्थिती आहे, ज्यात तुमच्या शरीराचं तापमान 95 डिग्री सेल्सिअरपर्यंत घसरतं. त्यामुळे शरीरातून निर्माण होणारी उष्णता अगदी कमी होते. त्यामुळे हृदयाची गती कमी होते आणि शरीरातील एक एक अवयव काम करणं बंद होतं. याचा सर्वाधिक प्रभाव श्वासोच्छवासावर होतो. व्यक्तीला श्वास घेता येत नाही. शेवटी व्यक्तीचा मृत्यू होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world