देशाला लवकरच पहिली वंदे भारत मेट्रो (First Vande Bharat Metro) रेल्वे मिळणार आहे. त्याचा पहिला लुक समोर आलीय. वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर ही रेल्वे तयार करण्यात येत आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनची (Vande Bharat Metro Train) ट्रायल जुलै महिन्यात सुरु होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला 50 वंदे मेट्रो (VB Metro) सुरु करण्याची योजना आहे. त्यानंतर या मेट्रो टेनची संख्या 400 पर्यंत वाढणार आहे. ही अत्याधुनिक रेल्वे देशातील 12 मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये चालवण्यात येणार आहे.
रेल कोच फैक्ट्री कपूरथला में तैयार हुई है वंदे भारत 'मेट्रो', पहले 50 ऐसी मेट्रो ट्रेन तैयार करने का प्लान है जो बाद में बढ़ाकर 400 किया जाएगा. 100 से 250 km के बीच वंदे भारत मेट्रो को दौड़ाया जाएगा#IndianRailways #VandeBharat #metro pic.twitter.com/1tGybHMt1P
— NDTV MP Chhattisgarh (@NDTVMPCG) May 1, 2024
वंदे भारत मेट्रोमध्ये सुरुवातीला 12 कोच असतील. त्यानंतर ही संख्या 16 पर्यंत वाढणार आहे. यामध्ये प्रवासी बसून तसंच उभं राहून प्रवास करु शकतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world