Vande Bharat sleeper trains : भारतीय रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरुवात करण्यात आली आहे. या ट्रेनच्या तिकिटांबाबत याआधीच माहिती देण्यात आली आहे. मात्र आता रेल्वेकडून तिकीट रद्द करणे आणि रिफंडबाबतचे नियम जारी करण्यात आले आहेत. तुम्हीदेखील वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करण्याचं प्लानिंग करीत असाल तर तिकीट रद्द करण्यासाठी तुम्हाला किती चार्ज द्यावा लागेल, त्याबाबत जाणून घेऊया.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट रद्द करण्याचे नियम...l (Vande Bharat tickets Rules regarding cancellation and refund)
भारतीय रेल्वेकडून प्रिमियम ओव्हरनाइट सेवेसाठी चालवली जाणारी वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट रद्द करणे आणि रिफंडबाबतच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशाचं तिकीट कन्फर्म झालं आणि प्रवासाच्या काही तासांपूर्वी तिकीट रद्द करायचं असल्यास प्रवाशाला किती शुल्क मोजावे लागतील?
नक्की वाचा - Vande Bharat चा चहा नाकारून प्लॅटफॉर्मवर उतरला; परतताना ट्रेनच्या दाराजवळ असं काही घडलं की, प्रवासी हैराण!
तिकीट रद्द करण्याचा चार्ज किती असेल?
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट रद्द करणे आणि रिफंडशी संबंधित नियमांनुसार, जर प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द करीत असेल तर त्याच्या तिकिटाच्या रकमेतून २५% वजा करून संपूर्ण रक्कम परत केली जाईल.
- जर ट्रेन सुटण्याच्या ८ तास ते ७२ तास आधी तिकीट रद्द केलं तर ५० टक्के भाग वजा करून उरलेली रक्कम परत केली जाईल.
- जर प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपर्यंत तिकीट रद्द केलं नाही आणि त्यानंतर तिकीट रद्द केलं तर प्रवाशाला रिफंड मिळणार नाही.
- जर तुम्ही वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करण्याचं प्लानिंग करीत असाल तर तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द करायचं असेल तर वरील सर्व बाबी लक्षात ठेवा.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील दाखवला, शनिवारी हावडा आणि कामाख्यादरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरुवात झाली आहे.