जाहिरात

Vande Bharat चा चहा नाकारून प्लॅटफॉर्मवर उतरला; परतताना ट्रेनच्या दाराजवळ असं काही घडलं की, प्रवासी हैराण!

वंदे भारत एक्सप्रेसमधील चहाला नाकारून प्लॅटफॉर्मवरील चहाची तलफ पूर्ण करणं प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे.

Vande Bharat चा चहा नाकारून प्लॅटफॉर्मवर उतरला; परतताना ट्रेनच्या दाराजवळ असं काही घडलं की, प्रवासी हैराण!

Vande Bharat Passenger missed Train: सोशल मीडियावर अनेक मजेशीर किस्से पाहायला मिळतात. एक व्यक्ती वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करीत होता. ट्रेन काही वेळासाठी एका स्टेशनवर थांबली. चहा घेण्यासाठी एक प्रवासी प्लॅटफॉर्म उतरला. मात्र हा निर्णय त्याला महागात पडला. तो प्लॅटफॉर्मवर उतरून चहा घ्यायला गेला. तेवढ्यात असं काही घडलं की हा अनुभव तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्हीही वंदे भारतने प्रवास करीत असाल किंवा प्रवासाचा प्लान असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. प्लॅटफॉर्मवरील एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. 

चहाच्या नादात ट्रेन सुटली...

वंदे भारत एक्सप्रेस थांबताच प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरला. त्याला चहाची तलफ आली होती. त्याला प्लॅटफॉर्मवर चहा मिळाला. मात्र तो ट्रेनजवळ येईपर्यंत एक्सप्रेसचं दार बंद झालं होतं. तो दारासमोर उभा राहिला. प्रवाशाला वाटलं बटन दाबताच दार उघडेल. मात्र प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजली. ट्रेन सुटणार असल्याचं लक्षात येताच त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि तो धावत सुटला. साधारण १७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये प्रवाशांना एक महत्त्वाची शिकवण मिळाली आहे. 

नक्की वाचा - RRB Jobs 2025 : रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख

पाहा Video:


सोशल मीडियावर व्हायरल...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (@indian_railway_0542) नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  एका वापरकर्त्याने लिहिलंय, पहिल्या डब्यातील मोटरमनला विनंती कर, तो दार उघडेल आणि एक्सप्रेसमध्ये चढायला मदत करेल. वंदे भारतमध्ये चहा मिळत असताना तरुणाला खाली उतरण्याची गरज काय होती, अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनचं दार बंद झाल्यावर ते लगेच उघडत नाही. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमधून खाली उतरायचं असल्याचं आधी विचारपूस करून घ्यावी. ट्रेनचा थांबा किती वेळ आहे हे एकदा तपासून घ्या. अन्यथा तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते.त्यामुळे चहा नाही मिळाला तरी चालेल पण वंदे भारत थांबणार नाही हे निश्चित. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com